E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
रविवार केसरी
भाषेचा अकारण वाद
Samruddhi Dhayagude
08 Jun 2025
राज्यरंग : व्ही. त्यागराजन
प्रसिध्द चित्रपट अभिनेते कमल हसन यांनी तामिळ भाषेतून कन्नडचा जन्म झाला असे विधान केले आणि दक्षिणेत मोठा वाद सुरु झाला. आजच्या युगात कोणती भाषा जुनी, कोणती श्रेष्ठ असा वाद घालण्याचे काहीही कारण नाही. भाषा भगिनी परस्पर सहकार्याने वाढतात, हे नेहमीच पहायला मिळाले आहे.
प्रसिध्द अभिनेते कमल हसन यांनी कन्नड भाषा तामिळ भाषेतून निर्माण झाल्याचे विधान केल्यापासून कर्नाटकात प्रचंड गदारोळ सुरू आहे. सामान्य कन्नड भाषकांपासून ते राजकारण्यांपर्यंत सर्वांनीच हसन यांच्यावर टीका केली . हसन यांच्या नवीन ‘ठग लाईफ’ या चित्रपटावर कर्नाटकात बहिष्कार जाहीर झाला. कमल हसन यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, की मी भाषेबद्दल बोलण्यास पात्र नाही. कोणताही राजकारणी भाषेबद्दल बोलण्यास पात्र नाही, मीही यात सामील आहे. तथापि, यानंतरही हा वाद थांबताना दिसत नाही. त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान पुढे आलेल्या विधानाने वाद सुरू झाला.
चेन्नईमध्ये कमल हसन यांच्या ‘ठग लाईफ’ या चित्रपटाच्या जाहिरातीच्या कार्यक्रमात त्यांच्यासोबत कन्नड अभिनेते शिवराजकुमारदेखील उपस्थित होते. त्या वेळी हसन शिवराजकुमार यांच्याकडे बोट दाखवत म्हटले, की तो आमच्या कुटुंबाचाही एक भाग आहे. त्यांची भाषा (कन्नड) ही आमच्या भाषेतून (तामिळ) आली आहे. कन्नड भाषकांनी हसन यांचे विधान आपला अपमान असल्याचे म्हणत गोंधळ घातला. कर्नाटकात हसन यांच्या विरोधात निदर्शने झाली आणि बिनशर्त माफी न मागितल्यास त्यांचे चित्रपट े प्रदर्शित होऊ न देण्याची धमकी दिली. हसन यांनी माफी मागण्यास नकार दिल्यानंतर हा वाद जणू दोन राज्यांमधील वादविषय बनला.
हसन हे तामिळनाडूमधील मक्कल निधी मय्यम (एमएनएम) या राजकीय पक्षाचे संस्थापक आहेत आणि त्यांचा पक्ष राजकारणात सक्रिय आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या विधानाला कर्नाटक आणि तामिळनाडूमधील पाण्यासह अनेक मुद्द्यांवरच्या जुन्या वादांशीदेखील जोडले जात आहे. कर्नाटकमधून तीव्र वाद उभा राहिल्यानंतर हसन यांनी माफी न मागता, ‘मी जे बोललो ते प्रेमाने बोललो होतो आणि अनेक इतिहासकारांनी मला भाषेचा इतिहास शिकवला आहे. माझा कोणत्याही भाषेचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. तामिळनाडू हे असे राज्य आहे, जिथे मेनन मुख्यमंत्री राहिले आहेत, रेड्डी आमचे मुख्यमंत्री राहिले आहेत. एक कन्नड अय्यंगारही आमचे मुख्यमंत्री राहिले आहेत’ असे त्यांनी सांगितले. राजकारणी भाषेवर बोलण्यास पात्र नाहीत. त्यांच्याकडे याबद्दल बोलण्याची क्षमता नाही, अशी टीका त्यांनी केली. इतिहासकार, पुरातत्वशास्त्रज्ञ आणि भाषाशास्त्रज्ञांनी या बाबींवर सखोल चर्चा करावी, असा सल्ला त्यांनी दिला.
द्रविड भाषांच्या उत्पत्तीचा शोध घेण्यासाठी अनेक लोकांनी संशोधन केले. इंग्रज विद्वान आणि संशोधक रॉबर्ट काल्डवेल यांनी द्रविड भाषांवर केलेल्या संशोधनाचा संदर्भ जगभरातील लोक घेतात. त्यात भाषातज्ज्ञांचाही समावेश आहे. पूर्वी अण्णामलाई विद्यापीठात द्रविड भाषा केंद्र होते.. पूर्वी पाच द्रविड भाषा होत्या. त्यात तामिळ, तुळु, कन्नड, तेलुगू आणि मल्याळम यांचा समावेश आहे. त्यांना ‘पंच’ द्रविड भाषा म्हणतात. द्रविड भाषा गटात १३० हून अधिक भाषा मोडत आहेत. कन्नड, तामिळ आणि तेलुगु यांचे नाते बहिणींचे आहे. कन्नड भाषेचा उगम तामिळ भाषेतून झाला नाही; परंतु लोक आपल्या भाषेचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्याबाबत आग्रह धरत राहतात. भाषेभोवती ते राजकारण खेळतात.
कर्नाटकाच्या राजकारण्यांनी हसन यांच्या विधानावर टीका केली आहे. काँग्रेस नेते आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, कन्नडचा इतिहास खूप जुना आहे; पण ‘बिचार्या’ हसन यांना त्याची काहीच माहिती नाही. माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी हसन यांच्या विधानाला अहंकाराची मर्यादा ओलांडणारे आणि कन्नड भाषेचा तसेच अभिनेते शिवराजकुमार यांचा अपमान करणारे म्हटले.
दोन्ही द्रविड भाषांचा इतिहास खूप जुना आहे. भाषातज्ज्ञांच्या मते दोन्ही द्रविड कुटुंबातील महत्त्वाच्या भाषा आहेत. त्यांचा उगम द्रविडच्या वेगवेगळ्या शाखा म्हणून झाला. कन्नड ही आज सुमारे ३.८ कोटी लोकांची पहिली आणि सुमारे एक कोटी लोकांची दुसरी भाषा आहे. दुसरीकडे, भारत, श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया, मॉरिशस, फिजी आणि दक्षिण आफ्रिका यासह सुमारे सात देशांमध्ये तामिळ एक महत्त्वाची भाषा म्हणून बोलली जाते .तामिळभाषकांची संख्या सुमारे सात कोटी आहे. कन्नड भाषेचा जन्म सुमारे २५०० वर्षे जुना असल्याचे मानले जाते. सर्वात जुना कन्नड शिलालेख हलमिदी या छोट्या समुदायात सापडला आहे. तो इसवी सन पूर्व ४५० मधील असल्याचे आढळून आले आहे. हा कदंबांचा शिलालेख आहे. तथापि, काही इतिहासकारांचा दावा आहे की, कन्नड भाषा इसवी सनपूर्व तिसर्या शतकातही बोलली जात होती.
अलेक्झांड्रियाचे विद्वान टॉलेमी यांनी लिहिलेला भूगोल हा कन्नड भाषेच्या प्राचीनतेचा एक महत्त्वाचा दस्तावेज मानला जातो. त्यात कर्नाटकामधील कलगेरिस (सध्याचे कलकेरी), बदामिओस (बदामी), मोडोगुल्ला (मुदुघल) सारख्या ठिकाणांचा उल्लेख आहे. हा दस्तावेज इसवी सनाच्या दुसर्या शतकातील आहे. काही इतिहासकारांच्या मते कन्नड भाषेचा उगम इसवी सनपूर्व सुमारे ९५० वर्षांमधील आहे. कर्नाटकमध्ये सापडलेल्या सम्राट अशोकच्या शिलालेखांमध्येही कन्नड शब्द सापडले आहेत. तथापि, . कन्नड भाषेचा विकास ब्राह्मी लिपीच्या दक्षिणेकडील रूपांपासून झाला, असे मानले जाते. कन्नड भाषेला तिचे सध्याचे नाव नवव्या शतकात मिळाले.
राजा नृपतुंगावर कविराज मार्ग हा काव्यग्रंथ कन्नड भाषेतील सर्वात जुना साहित्यिक ग्रंथ मानला जातो. यापूर्वी सातव्या शतकात बदामी येथील कप्पे अर्भट्टचा रेकॉर्ड कन्नडचा पहिला काव्यग्रंथ मानला जातो. त्याआधीही पाचव्या शतकात मंगलेशचा बदामी रेकॉर्डदेखील सापडला आहे. कन्नड भाषा जुनी आणि पूर्व-जुनी अशा दोन भागात विभागली गेली आहे. जुन्या कन्नडची नोंद ८०० ते १००० इसवी सनाची आहे, तर पूर्व-जुनी कन्नडची नोंद र् ४५० ते ८०० इसवी सनाची आहे. कन्नड भाषेच्या आधुनिक लिपीचे सर्वात जुने रूप कदंब लिपी मानले जाते. होयसळ कन्नड लिपी ही या भाषेची सर्वात सजावटीची लिपी मानली जाते. ती होयसळ राजांनी कल्याण चालुक्य कन्नड लिपीतून विकसित केली होती.
तामिळ ही इसवी सनपूर्व २५०० ते १५०० या काळातील भाषा मानली जाते. भाषाशास्त्रज्ञांच्या मते तामिळ भाषा द्रविड भाषेचादेखील एक भाग आहे. ती सुमारे ३,५०० वर्षांपूर्वी संस्कृत घेऊन भारतात आलेल्या ‘इंडो-आर्यां’च्या आगमनापूर्वी येथे बोलली जात होती. या दाव्यानुसार, तामिळ भाषा ४,००० ते ४,५०० वर्षे जुनी असू शकते. तामिळ भाषेचे साहित्य, कविता आणि धार्मिक हस्तलिखिते इ.स.पूर्व तिसर्या शतकापासून आढळतात.
तथापि, द्रविड भाषा गटापासून वेगळी भाषा म्हणून तामिळ भाषेची सुरुवात इ.स.पूर्व एक हजारपासून झाली, असे मानले जाते. ही ‘अभिजात’ (क्लासिक) तमिळ मानली जाते. मध्ययुगीन काळात चोल साम्राज्यातील राजराज चोल-१ आणि राजेंद्र चोल-१ यांनी तामिळ शिलालेख, मंदिर वास्तुकला आणि साहित्याला प्रोत्साहन दिले. दोन्ही भाषांचा इतिहास पाहिल्यास त्या एकाच भाषा गटातून जन्माला आल्या आहेत, हे स्पष्ट होते. परंतु कमल हसन यांचा कन्नड भाषा तामिळ भाषेतून जन्माला आली आहे, हा दावा बरोबर वाटत नाही. द्रविड भाषा गटाचा भाग असल्याने, दोघांमध्ये काही समानता असू शकतात; परंतु प्रत्यक्षात दोन्ही भाषा खूप वेगळ्या भाषा म्हणून विकसित झाल्या आहेत.
Related
Articles
वर्हाडाच्या मोटारीला उत्तर प्रदेशात अपघात
19 Jun 2025
व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या
20 Jun 2025
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार
23 Jun 2025
थेट कराचे संकलन घटले
22 Jun 2025
वाचक लिहितात
18 Jun 2025
पीबीजी कोल्हापूर टस्कर्सना एमपीएल प्लेऑफमध्ये प्रवेश
20 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मराठी साहित्य विश्वाने अरण्यऋषी गमावला
2
भाषा शिक्षणाचे शिक्षणातील महत्त्व
3
तुर्कीला उत्तर? (अग्रलेख)
4
ह्रिदयाचे कराटेमध्ये सुवर्णपदक
5
अखिलेश यांची ग्वाही (अग्रलेख)
6
यंदाच्या वर्षीचे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर