E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पावसाने हाहाकार
Wrutuja pandharpure
21 May 2025
फलक आणि झाडे कोसळली; जमीन खचली
पुणे
: मुसळधार अवकाळी पावसाने मंगळवारी पुण्यात हाहाकार उडाला. पावसामुळे काही ठिकाणी फलक कोसळले. तसेच, सीमाभिंत लगतची जमीन खचण्याची घटना घडली. दुपारच्या सुमारास अवघ्या काही मिनिटांत रस्त्यांवर पाणी-पाणीच साचले. विशेषतः उपनगरांत पावसाचा जोर अधिक होता. येत्या चोवीस तासांत मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
काल दुपारी साडेतीनच्या सुमारास शहरात अचानक मुसळधार पावसास सुरुवात झाली. पावसाचा जोर इतका होता की, काही मिनिटांत शहरातील अनेक रस्त्यावर पाणी साचले. त्यामुळे वाहन चालकांचे आणि नागरिकांचे मोठे हाल झाले. दुपारची वेळ असल्याने पुणेकरांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले नाही. पण, सर्वसामान्यांचे हाल झाले. पथारी व्यावसायिकांचे फळे आणि पालेभाज्या पावसामुळे रस्त्यावर आल्या.
शहर आणि परिसरात मागील चार दिवसांपासून अधून-मधून मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे. काल सकाळी ऊन पडले होते. मात्र, दुपारी उकाड्यात वाढ झाली आणि पाहता पाहता आकाशात ढग दाटून आले, त्यानंतर मेघगर्जनेसह शहर आणि उपनगरात जोराचा पाऊस झाला. पावसाला सुरुवात झाल्यानंतर विविध कामानिमित्त घराबाहेर पडलेल्यांना आश्रयाला थांबावे लागले. दुचाकी चालकांनाही वाहन कडेला थांबवावे लागले. सुमारे तासभर पावसाचा जोर कायम होता. त्यानंतरही, पाऊस सुरुच राहिला. मात्र, त्याची तीव्रता कमी झाली होती. पण, रात्री उशीरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. कात्रज, आंबेगाव पठार, बालाजीनगर, सहकारनगर, मार्केट यार्ड, अप्पर इंदिरा नगर, बिबवेवाडी, शिवाजीनगर, गोखले नगर, कोथरुड, कर्वेनगर, वारजे, शिवणे, धायरी, वडगाव, सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, शंकरशेठ रस्ता या भागात पावसाचा जोर अधिक होता. मध्य वस्तीपेक्षा उपनगरांत अधिक पाऊस पडला. त्यामुळे उपनगरातील बहुतांश रस्त्यांवरून पाणी वाहत होते.
पद्मावतीनगरमध्ये जमीन खचली
धनकवडीतील पद्मावती नगर सोसायटीच्या सिमाभिंती लगत असणारा भाग पावसामुळे कोसळला. येथील पत्राच्या एका घरावर ही माती आणि दगड आले. या घरात अडकलेल्या दोन नागरिकांना अग्निशमन दलाकडून सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. अग्निशमन दल आणि महापालिका प्रशासनाकडून संबंधित इमारत परिसराची पाहणी करण्यात येत आहे.
सणसवाडी, धानोरीत कोसळले फलक
सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे शहर आणि परिसरात दोन ठिकाणी फलक कोसळले. पुणे-अहिल्यानगर महामार्गावर सणसवाडी येथे रस्त्याच्या लगत असलेले फलक कोसळले. त्यामुळे सात ते आठ दुचाकींचे नुकसान झाले. सुदैवाने, यात कोणती जखमी झाले नाही.
पावसाच्या सरीबरोबरच सोसाट्याच्या वारा वाहत होता. कोरेगाव पार्क, येरवडा, धानोरी, टिंगरेनगर, एरंडवणा, देवाची ऊरळी परिसरात १० ठिकाणी झाडे कोसळली. सुदैवाने, यात कोणीही जखमी झाले नाही. महापालिका आणि अग्निशमन दलाकडून तत्कळ रस्त्यावरील झाडे काढण्यात आली.
Related
Articles
पिंपरी पालिकेच्या तिजोरीत ३१२ कोटी जमा
12 Jun 2025
महागाईपासून सर्वसामान्यांना मोठा दिलासा
13 Jun 2025
कर्नाटक काँग्रेसमध्ये फूट पाडण्यासाठी ‘ईडी’चे छापे
12 Jun 2025
मुंबईहून लंडनसाठी उड्डाण घेतलेले एअर इंडियाचे विमान परत मागे
13 Jun 2025
नर्हे परिसरात दुचाकी पेटवणारा ताब्यात
13 Jun 2025
कलाकाराने तांत्रिक अंगांचाही अर्थार्जनासाठी विचार करावा
14 Jun 2025
पिंपरी पालिकेच्या तिजोरीत ३१२ कोटी जमा
12 Jun 2025
महागाईपासून सर्वसामान्यांना मोठा दिलासा
13 Jun 2025
कर्नाटक काँग्रेसमध्ये फूट पाडण्यासाठी ‘ईडी’चे छापे
12 Jun 2025
मुंबईहून लंडनसाठी उड्डाण घेतलेले एअर इंडियाचे विमान परत मागे
13 Jun 2025
नर्हे परिसरात दुचाकी पेटवणारा ताब्यात
13 Jun 2025
कलाकाराने तांत्रिक अंगांचाही अर्थार्जनासाठी विचार करावा
14 Jun 2025
पिंपरी पालिकेच्या तिजोरीत ३१२ कोटी जमा
12 Jun 2025
महागाईपासून सर्वसामान्यांना मोठा दिलासा
13 Jun 2025
कर्नाटक काँग्रेसमध्ये फूट पाडण्यासाठी ‘ईडी’चे छापे
12 Jun 2025
मुंबईहून लंडनसाठी उड्डाण घेतलेले एअर इंडियाचे विमान परत मागे
13 Jun 2025
नर्हे परिसरात दुचाकी पेटवणारा ताब्यात
13 Jun 2025
कलाकाराने तांत्रिक अंगांचाही अर्थार्जनासाठी विचार करावा
14 Jun 2025
पिंपरी पालिकेच्या तिजोरीत ३१२ कोटी जमा
12 Jun 2025
महागाईपासून सर्वसामान्यांना मोठा दिलासा
13 Jun 2025
कर्नाटक काँग्रेसमध्ये फूट पाडण्यासाठी ‘ईडी’चे छापे
12 Jun 2025
मुंबईहून लंडनसाठी उड्डाण घेतलेले एअर इंडियाचे विमान परत मागे
13 Jun 2025
नर्हे परिसरात दुचाकी पेटवणारा ताब्यात
13 Jun 2025
कलाकाराने तांत्रिक अंगांचाही अर्थार्जनासाठी विचार करावा
14 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भाषेचा अकारण वाद
2
अमेरिकेचा खोटेपणा उघड
3
यूट्यूबर जसबीर सिंग याचा कोठडीतील मुक्काम वाढला
4
स्वप्नवत् पुनरागमन
5
चौथे स्थान अजून लांब आहे..
6
सनदी अधिकारी ते चित्रपट नायक!