मुक्त व्यापार करुन देणार अमेरिकेला शह   

व्हिएतनाम दौर्‍यात जिनपिंग यांचा इशारा
 
हनोई : चीनने अमेरिकेच्या वाढीव आयात शुल्क वाढीचा धसका घेतला आहे.  त्यामुळे विविध देशांशी मुक्त व्यापार करुन अमेरिकेला शह देण्याची योजना त्याने आखली आहे. त्या अंतर्गत चीनचे अध्यक्ष झी जिंनपिंग आग्नेय आशियातील देशांच्या दौर्‍यावर आले आहेत.
 
चीन हा स्थिर आणि विश्वासाचे प्रतीक आहे, हे दाखविण्यासाठी जिनपिंग यांनी आग्नेय आशियातील देशांचा दौरा करत आहे.. व्हिएतनाममध्ये त्यांचे आगमन झाले असून त्यांनी हनोई येथे व्हिएतनाम कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक  आणि माजी अध्यक्ष हो ची मिन यांंना पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली. या प्रसंगी व्हिएतनामचे अध्यक्ष लाँग च्युंग याच्यासमवेत होते. व्हिएतनामानंतर जिनपिंग मलेशियाचा तीन दिवसांचा दौरा करणार आहेत. कंबोडियाच्या दौर्‍यानंतर ते मायदेशी परतणार आहे. 
  
युद्धाच्या आठवणी ताज्या 
 
दुसर्‍या महायुद्धात आणि त्यानंतर व्हिएतनाम आणि चीनने एकत्रित अमेरिकेविरोधात लढा दिला होता. आता जागतिक अर्थव्यस्थेचा लाभ घेण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्र येण्याची गरज जिनपिंग आणि च्युंग यांनी व्यक्त केली. कोणतेही एकतर्फी कायदे मान्य केले जाणार नाहीत. तसेच मुक्त व्यापार धोरणावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. तसेच जागतिक पुरवठा साखळी सुरूच राहिल यावर भर देण्याचा निर्णय चीन आणि व्हिएतनाम यांनी एकमुखाने घेतला. 

Related Articles