खोटी बंदूक दाखवून सराफी दुकानावर दरोडा   

पुणे : धायरी येथील रायकर मळा परिसरातील एका सराफाच्या दुकानात शिरलेल्या तिघा चोरट्यांनी बनावट प्लास्टिकच्या पिस्तुलाचा धाक दाखवत २५ ते ३० तोळे सोने लुटून नेल्याची घटना मंगळवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
 
धायरी येथील रायकर मळा परिसरात असलेल्या काळूबाई चौकामध्ये विष्णू सखाराम दहिवाल यांच्या मालकीचे ’श्री ज्वेलर्स’ हे सराफाचे दुकान आहे. या दुकानामध्ये मंगळवारी दुपारी तीन दरोडेखोरांनी हल्ला केला. दहिवाल आणि एक कामगार दुकानात असताना एका आरोपीने आत प्रवेश केला आणि सोनसाखळी दाखवण्यास सांगितले. त्यावेळी, दुकानमालक दहिवाल हे सोनसाखळी दाखवत असताना इतर दोन आरोपी दुकानात शिरले आणि पिस्तुलाचा धाक दाखवला.आरोपींनी दहिवाळ यांना शिवीगाळ केली आणि दुकानातील दागिने लुटण्यास सुरूवात केली. 

Related Articles