E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
वसंत व्याख्यानमालेत सदानंद मोरे, राजा दीक्षित, मिलिंद जोशी, शंकर अभ्यंकर
Samruddhi Dhayagude
16 Apr 2025
शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष; सुमेधा चिथडे यांना रानडे पुरस्कार
पुणे : वक्तृत्वोत्तेजक सभेच्या वतीने सोमवार, दि.२१ एप्रिलपासून वसंत व्याख्यानमालेला सुरूवात होत आहे. व्याख्यानमालेचे यंदा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. ही व्याख्यानमाला २० मे पर्यंत दररोज सायंकाळी ६ वाजता टिळक स्मारक मंदिरात होईल. व्याख्यानमाला विनामूल्य आणि सर्वांसाठी खुली आहे. वक्तृत्वोत्तेजक सभेचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक व प्रमुख कार्यवाह डॉ. गीताली टिळक यांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली.
या ज्ञानसत्रात साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, विश्वकोश मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, डॉ. शंकर अभ्यंकर, हेरंब कुलकर्णी, ज्येष्ठ लेखिका डॉ. नीलिमा गुंडी, रंगभूमीचे अभ्यासक प्रसाद वनारसे, ज्येष्ठ साहित्यिक सुनीलकुमार लवटे, मंगला गोडबोले, डॉ. आदित्य अभ्यंकर, सुलभा तेरणीकर कर्नल अनिल आठले, डॉ. वर्षा तोडमल यांची व्याख्याने होणार आहेत. व्याख्यानमालेत साहित्य, समाजकारण, संस्कृती, इतिहास, कायदा, जागतिक रंगभूमी, चित्रपट, आर्थिक, आरोग्य आदी विषयांवर विविध ज्येष्ठांचे विचार श्रोत्यांना ऐकता येणार आहेत.
‘सिर्फ’ संस्थेच्या माध्यमातून दिव्यांग व शहीद सैनिकांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करणार्या तसेच तरूणांना सशस्त्र दलात सामील होण्याची प्रेरणा देत असलेल्या सुमेधा चिथडे यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून न्या. महादेव गोविंद रानडे पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. वक्तृत्वोत्तेजक सभेचे अध्यक्ष आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते २९ एप्रिल रोजी न्या. रानडे पुरस्कार वितरण सोहळा होईल. पुरस्कार वितरणानंतर सुमेधा चिथडे यांचे ‘राष्ट्राय स्वाहा इदं न मम’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. हे न्या. रानडे स्मृती व्याख्यान आहे.
दि. २१ एप्रिल रोजी डॉ. राजा दीक्षित हे ‘लोकमान्यांचे योगदान: ऐतिहासिक मीमांसा’ या विषयावर व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफतील. उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांच्या व्याख्यानाने २० मे रोजी या व्याख्यानमालेचा समारोप होईल. दि. २२ एप्रिल रोजी प्रसिद्ध लेखिका डॉ. वर्षा तोडमल या ‘आरोग्य : शरीराचे आणि मनाचे’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. ३० एप्रिल रोजी जयंतराव टिळक स्मृती व्याख्यानाचे पुष्प सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार गुंफणार आहेत.
२४ एप्रिल रोजी ‘न्या. रानडे, लो. टिळक, तर्कतीर्थ : धर्म आणि सामाजिक सुधारणा’ या विषयावर डॉ. सुनिलकुमार लवटे विचार मांडणार आहेत.२७ एप्रिल रोजी वि. गो. साठे स्मृती व्याख्यान आहे. या व्याख्यानाचे पुष्प ‘लोकप्रिय चित्रपट आणि लोकप्रिय संगीत’ या विषयावर सुलभा तेरणीकर गुंफणार आहे. २८ एप्रिल रोजी बाजीराव पेशवे स्मृती व्याख्यान आहे. हे व्याख्यान डॉ. सदानंद मोरे देणार आहेत. ‘मराठ्यांचे उपेक्षित साम्राज्य’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे.
१ मे रोजी दत्तो वामन पोतदार स्मृती व्याख्यान आहे. डॉ. श्रद्धा कुंभोजकर ‘दीडशे वर्षांपूर्वीचा महाराष्ट्र’ या विषयावर व्याख्यान देतील. ७ मे रोजी गौरी टिळक स्मृती व्याख्यानात ‘मेंदूचा पासवर्ड’ या विषयावर डॉ. श्रुती पानसे आपले विचार मांडणार आहेत. ८ मे रोजी सदा डुंबरे स्मृती व्याख्यानात निवृत्त कर्नल अनिल आठल्ये हे ‘भारत-चीन सीमा विवाद, सत्य आणि मिथक’ या विषयावर बोलणार आहेत. १२ मे रोजी डॉ. संप्रसाद विनोद हे ‘योग-एक परिपूर्ण जीवनशैली’ या विषयावर बोलतील, हे अद्वैत बडवे स्मृती व्याख्यान असेल. १३ मे रोजी सारंग साठे स्मृती व्याख्यान आहे. हे व्याख्यान डॉ. सुवर्णा जोशी ‘साथीच्या रोगाचे निदान आणि माझा प्रवास’ या विषयावर देतील.
१४ मे रोजी पुनमचंद सुराणा स्मृती व्याख्यान आहे. या व्याख्यानाचे पुष्प जयश्री काळे ‘विंदादर्शन’ या विषयावर गुंफणार आहेत. १७ मे रोजी सुंदराबाई सुराणा स्मृती व्याख्यान आहे. या व्याख्याचे पुष्प ‘भाषा, कविता आणि संस्कृती’ या विषयावर डॉ. नीलिमा गुंडी आपले विचार मांडणार आहेत.
या खेरीज अभिनेते शरद पोंक्षे, मुकुंद फडके, डॉ. संजय उपाध्ये, महेंद्र गोखले, डॉ. मेधा सामंत, डॉ. प्रा. चैतन्य आठले, रणजित गाडगीळ, डॉ. दिलीप पटवर्धन आणि संतोष जोशी यांची विविध विषयांवर व्याख्याने होणार आहेत.
वसंत व्याख्यानमालेतील सर्व व्याख्याने ज्ञान सत्राच्या समारोपानंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या मास-कॉम विभाग, यूट्यूब चॅनेलद्वारे काही कालावधीने प्रसारित केली जातील. दि. १ मे रोजी सुट्टी असल्याने या दिवशीचे व्याख्यान त्याच दिवशी https://youtube.com/@TMVMassCommunication या यूट्यूब चॅनेल लिंकवर प्रसारित होईल. या व्याख्यानमालेला टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रमुख प्रायोजकत्व लाभले आहे, असे डॉ. गीताली टिळक यांनी सांगितले.
Related
Articles
डॉ. तारा भवाळकर यांना भारती विद्यापीठाचा जीवनसाधना गौरव पुरस्कार
23 Apr 2025
नियोजित काश्मीर दौरे रद्द
24 Apr 2025
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेन याने मारला सर्वात लांब षटकार
25 Apr 2025
ब्रिटिश इतिहासकारांकडून मराठ्यांचे कर्तृत्व दुर्लक्षित
29 Apr 2025
‘एनसीईआरटी’च्या पुस्तकांतून मुघल बाहेर ; महाकुंभ, सरकारी योजनांचा प्रवेश
28 Apr 2025
ग्रामविकासाला चालना देण्यासाठी जिल्हा परिषदेने योगदान द्यावे : ग्रामविकास मंत्री गोरे
27 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बैसारन येथे अडकले पिंपरी चिंचवडचे ३२ पर्यटक
2
गुलाबप्रेमी जयंतराव टिळक
3
काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचा भाजपात प्रवेश
4
नंदनवनात रक्तपात (अग्रलेख)
5
चमकते तेच सोने (अग्रलेख)
6
पाकिस्तानला इशारा (अग्रलेख)