E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
जगप्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठाचा २.२ अब्ज डॉलर्सचा निधी रोखला
Samruddhi Dhayagude
15 Apr 2025
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत आल्यापासून घेतलेल्या बऱ्याच निर्णयांमुळे जगाला धक्के बसत आहेत. ट्रम्प यांनी देशातील नागरिकांना देखील धक्के दिले आहेत. देशांतर्गत कारभारात त्यांनी काही मोठे निर्णय घेतले. आता ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठाला दिले जाणारे २.२ अब्ज अमेरिकन डॉलर्सहून अधिक अनुदान गोठवले. विद्यापीठाने व्हाइट हाऊसच्या काही मागण्या पूर्ण करण्यास नकार दिला होता. विद्यापीठातील विद्रोही विचारांना आळा घालण्यासंदर्भात ट्रम्प प्रशासनाने दिलेले आदेश विद्यापीठाने नाकारले होते. त्यामुळेच ट्रम्प प्रशासनाने विद्यापीठाविरोधात आक्रमक पाऊल उचलले आहे.
हार्वर्ड विद्यापीठाने सोमवारी (१४ एप्रिल) जाहीर केले होते की, व्हाइट हाउसने केलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी विद्यापीठाच्या धोरणांमध्ये बदल केला जाणार नाही. व्हाइट हाउसने शुक्रवारी (११ एप्रिल) विद्यापीठाला एक पत्र पाठवले होते. त्यामध्ये ट्रम्प प्रशासनाने विद्यापीठाच्या नेतृत्व बदलाचे आवाहन केले होते. ट्रम्प प्रशासनाने हार्वर्ड विद्यापीठाला सांगितले होते की, विद्यापीठावर त्यांच्या अभ्यास मंडळाचे, प्राध्यापकांचे व नेतृत्वाचे लक्ष असून ‘गुणधर्मावर आधारित प्रवेश’ आणि भरती धोरणांचे ऑडिट करण्याची आवश्यकता लादली जाईल. तसेच फेस मास्कवर बंदी घालण्याची मागणीही प्रशासनाकडून करण्यात आली होती.
संघराज्याचे अतिक्रमण स्वीकारार्ह नाही : हार्वर्ड विद्यापीठ
ट्रम्प प्रशासनाच्या पत्राला उत्तर देताना हार्वर्ड विद्यापीठाचे प्रमुख अॅलन गार्बर म्हणाले, “विद्यापीठ स्वतःच्या स्वातंत्र्याबाबत, संवैधानिक अधिकारांबाबत तडजोड करणार नाही. गार्बर यांनी विद्यापीठ भेदभाव दूर करण्यासाठी वचनबद्द आहे. तसेच विद्यापीठ शैक्षणिक स्वायत्तेत संघराज्याचे अतिक्रमण नाकारत आहे.” ट्रम्प प्रशासनाने हार्वर्ड विद्यापीठ व या विद्यापीठाशी संलग्न संस्थांना दिल्या जाणाऱ्या ९ अब्ज डॉलर्सच्या निधीबाबातचा प्राथमिक आढावा घेतल्यानंतर गार्बर यांनी हे वक्तव्य केले.
Related
Articles
सूर्यकुमार यादवच्या आयपीएलमध्ये वेगवान 4000 धावा
28 Apr 2025
शहरात १११ पाकिस्तानी नागरिकांचे वास्तव्य
26 Apr 2025
जागतिक रंगभूमीचा प्रभावी वापर करा
27 Apr 2025
उत्तर प्रदेशातून १०० टक्के पाकिस्तानी नागरिक बाहेर
28 Apr 2025
लाहोर विमानतळावर भीषण आग
27 Apr 2025
वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञानाबरोबरच डॉक्टरांना कायद्याचेही ज्ञान आवश्यक
29 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
गुलाबप्रेमी जयंतराव टिळक
2
बैसारन येथे अडकले पिंपरी चिंचवडचे ३२ पर्यटक
3
काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचा भाजपात प्रवेश
4
नंदनवनात रक्तपात (अग्रलेख)
5
चमकते तेच सोने (अग्रलेख)
6
पाकिस्तानला इशारा (अग्रलेख)