इस्रायलच्या लष्कर प्रमुखपदी इयाल जमीर यांची नियुक्ती   

जेरूसालेम : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इस्रायलच्या लष्कर प्रमुखपदी इयाल जमीर यांची नियुक्ती केली आहे. ६ मार्चला जमीर  पदभार स्वीकारणार आहेत. जमीर आयडीएफचे २४ वे जनरल बनले असल्याची माहिती इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने समाज माध्यमावर पोस्ट करुन दिली आहे.
हमासचे हल्ले रोखण्यात अपयशी ठरल्यानंतर मागील महिन्यात लष्करप्रमुख पदाचा हलेवी यांनी राजीनामा दिला होता. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविराम करारानंतर हलेवी यांचा राजीनामा निश्चित मानला जात होता. हलेवी यांनी जमीर यांचे अभिनंदन करताना म्हटले, मी एयालला अनेक वर्षांपासून ओळखतो आणि मला विश्वास आहे, की ते पुढील आव्हानांना तोंड देण्यासाठी आयडीएफचे नेतृत्व करतील. या जबाबदारीसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो.
 
कोण आहेत इयाल जमीर?
 
५९ वर्षीय एयाल जमीर २०२३ पासून संरक्षण मंत्रालयाचे संचालक म्हणून काम पाहत आहेत. हलेवी लष्कर प्रमुख झाल्यानंतर ते लष्करातून निवृत्त झाले होते. यापूर्वी त्यांनी डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ म्हणून काम केले आहे. तसेच इस्रायल लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख म्हणूनही काम पाहिले आहे.

Related Articles