युद्धविरामाबाबतच्या चर्चेपासून युक्रेनला बाजूला ठेवणे धोकादायक   

कीव : युक्रेनला युक्रेनला अमेरिका आणि रशिया यांच्यात होणार्‍या  संघर्षाच्या चर्चेतून वगळणे अत्यंत हानिकारक असेल, असे मत युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी व्यक्त केले. तसेच युद्धविराम योजना विकसित करण्यासाठी कीव आणि वॉशिंग्टन यांच्यात पुढील चर्चा व्हावी असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
 
झेलेन्स्कीने म्हणाले, रशिया युद्धविरामाच्या चर्चेत गुंतू इच्छित नाही, किंवा कोणत्याही प्रकारची मदत देण्याबाबत चर्चा करू इच्छित नाही. जर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियावर ऊर्जा आणि बँकिंग प्रणालीशी संबंधित निर्बंध लादण्याची धमकी दिली, तर पुतीन यांना वाटाघाटी करण्यास भाग पाडले जाऊ शकते. युद्धविरामाच्या चर्चेसाठी ही सर्वात महत्वाची पायरी आहे. अमेरिका आणि रशियन अधिकारी युद्ध संपवण्याबाबत चर्चा करत असल्याचे ट्रम्प यांनी सांगितल्यानंतर त्याला झेलेन्स्की यांनी उत्तर दिले.

Related Articles