डॉलर वगळून अन्य चलनांत रुपया बलवान   

नवी दिल्ली : मध्यमवर्गीयांच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्यााठी अंदाजपत्रक सादर केले आहे. सरकार मध्यमवर्गीयांवरील कराचा बोजा कमी करण्यहसाठी वचनबद्ध असून रुपयांचे मूल्य डॉलररच्या तुलनेत घसरले आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण, आर्थिक विकास करणार्‍या  अन्य देशांच्या चलनांचा विचार केला तर रुपयाचे मूल्य अधिक आहे, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी सांगितले. पीटीआयला दिलेल्या मुलाखातीत त्या म्हणाल्या, रुपया कमकुवत होत आहे, ही बाब मला अमान्य आहे. अन्य विकसित होणार्‍या देशांच्या अर्थव्यवस्थेचा विचार करता रुपया तुलनेत स्थिर आहे. गेल्या काही महिन्यांत डॉलरच्या तुलनेत रुपयाचे ३ टक्के घसरला आहे.  ही  बाब नक्कीच चिंतेची आहे, पण, आयात खर्च महाग होत आहे. त्यामुळे तसे घडत आहे  देशाची  मॅक्रो इकॉनॉमिक फंडामेंटल्स मजबूत आहेत.  

Related Articles