नॅक समितीच्या अध्यक्षासह जेएनयुच्या प्राध्यापकाला अटक   

सीबीआयची लाच प्रकरणी कारवाई; ३७ लाख जप्त

नवी दिल्ली : नॅक समितीचे अध्यक्ष, समितीचे सहा सदस्य, जेएनयुच्या प्राध्यापकासह दहा जणांना सीबीआयने शनिवारी लाच प्रकरणी अटक केली आहे. नॅकची मान्यता देण्यासाठी लाच स्वीकारल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला आहे. सीबीआयने ३७ लाख रुपये जप्त केले आहेत.  
 
सीबीआयने शनिवारी कारवाई केली होती. आंध्र प्रदेशातील गुंटूर येथील कोनेरु लक्ष्मय्या एज्युकेशन फाऊंडेशनचे (केएलईएफ) कुलगुरु जी. पी. सारधी वर्मा, उपाध्यक्ष कोनेरु राजा हरीन, विद्यापीठाचे संचालक ए. रामकृष्ण यांना सीबीआयने अटक केली आहे. त्या शिवाय नॅकचे अध्यक्ष आणि रामचंद्र चंद्रवंशी विद्यापीठाचे कुलुगुरू समरेंद्र नाथ सहा, समिती सदस्य राजीव सिजारिया, भारत इन्स्टिट्यूट ऑफ लॉचे अधिष्टाता राजेश सिंह पवार, जागरण लेकसीटी विद्यापीठाचे मानस कुमार मिश्रा, जी. एल. बजाज इन्स्टिट्ूट ऑफ टेक्नालॉजी आणि मॅनेजमेंटचे अधिष्टाता मानस कुमार, दावणगिरी विद्यापीठाच्या प्राध्यापिका गायत्री देवराजू आणि संभळपूर विद्यापुठाचे प्राध्यापक बाळू महाराज यांना अटक केली आहे. विद्यापीठाच्या हैदराबाद कँपसमध्ये नॅक समितीकडून मान्यता प्राप्त करण्यासाठीं समितीच्या सदस्यांना लाच दिल्याचेे हे प्रकरण आहे. दरम्यान, कोनेरु लक्ष्मय्या एज्युकेशन फाऊंडेशनचे अध्यक्ष कोनेरु सत्यनारायण, नॅकचे माजी उप सल्लागार ए. मंजुनाथ राव, बंगळुरू विद्यापीठाचे प्राध्यापक आणि आयक्यूइसी - नॅकचे संचालक एम. हनुमंतअप्पा आणि नॅकचे सल्लागार एम. एस. श्यामसुंदर यांची नावे सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात आहेत. 

Related Articles