E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
विठ्ठल-रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा
Wrutuja pandharpure
03 Feb 2025
पंढरपुर
, (प्रतिनिधी) : वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर विठ्ठल व रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा परंपरेनुसार श्री विठ्ठल सभा मंडप येथे भक्तिमय वातावरणात रविवारी पार पडला. सोहळ्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
सकाळी विठ्ठल रुक्मिणीमातेला शुभ्र वस्त्र तसेच रुक्मिणी मातेस मोत्याचे दागिने, नथ आणि अलंकार परिधान करण्यात आले होते. रुक्मिणी मातेच्या गर्भागृहातून गुलाल विठ्ठलाकडे नेण्यात आला. तिथे गुलालाची उधळण केल्यानंतर श्री विठ्ठलाचा गुलाल रुक्मिणी मातेकडे नेण्यात आला. तिथेही गुलालाची उधळण करण्यात आली. दुपारी १२ वाजता विठ्ठल रूक्मिणीमातेची पाद्यपूजा सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, संभाजी शिंदे, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखा अधिकारी मुकेश अनेचा यांच्या हस्ते पार पडली.विठ्ठल व रुक्मिणी मातेची अलंकाराने सजवलेली उत्सवमूर्ती या विवाह सोहळयाच्या ठिकाणी म्हणजे विठ्ठल सभामंडपातील फुलांनी सजविण्यात आलेल्या शाही मंडपात आणण्यात आली.
दोन्ही देवतास मुंडावळ्या बांधून आणल्या गेल्या. यानंतर अंतरपाट धरले आणि मंगलाष्टकास सुरवात झाली. मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मंगलाष्टका म्हटली. मंगलाष्टक झाल्यावर सर्व उपस्थित भाविकांनी शाही विवाह सोहळा साजरा केला. यावेळी मंदिर समितीमार्फत संत तुकाराम भवन येथे भोजनाची व्यवस्था भाविकांसाठी करण्यात आली होती. विवाह सोहळा पार पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला,अशी माहिती मंदिर समितीची व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
Related
Articles
कुलभूषण जाधव अपहरण प्रकरण
10 Mar 2025
पाणी टंचाई वाढणार; ४७३ गावांना बसणार झळ!
15 Mar 2025
ओडिशात ४१ बांगलादेशी नागरिकांवर गुन्हे : माझी
11 Mar 2025
शहरात होळी, धुळवड उत्साहात
15 Mar 2025
आकाशगंगांच्या अभ्यासासाठी नासाची दुर्बीण झेपावली
14 Mar 2025
पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून खोटे हिंदुत्व आयात : ममता
14 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
भारतचं चॅम्पियन
4
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
5
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
6
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)