जुन्नर नगरपालिकेकडून २१ जणांवर अतिक्रमण विरोधी कारवाई   

शिवनेरी, (वार्ताहर) : जुन्नर-नारायणगाव रस्त्यावरील पद पथ, शंकरपुरा पेठ,  धान्य बाजार येथे भाजीपाला व किरकोळ विक्रेते यांनी दुकाने थाटल्याने नागरिकांना ये-जा करणे कठीण झाले होते. बहुतेक वेळा अपघाताला नागरिकांना सामोरे जावे लागलेले आहे. यामुळे जुन्नर नगरपालिका प्रशासनने २१ अतिक्रमण धारकांच्या विरुद्ध कारवाई केली, अशी माहिती मुख्याधिकारी संदीप भोळे यांनी दिली. नवीन बस स्थानक येथील मार्गावरील पदपथ, बस स्थानक,  धान्य बाजार, नेहरू बाजार, परदेशपुरा व इतर परिसरात प्रामुख्याने कारवाई करण्यात आली आहे. यावेळी दुकानदारांनी दुकानाबाहेर लावलेले रस्त्यावरील फलक व पत्रा शेड काढण्यात आली . यामध्ये नऊ भाजीपाला विक्रेते, पाच हॉटेल व्यवसायिक, तीन दवाखाने, पान टपरी, कटलरी दुकान, फळ विक्रेते व स्नॅक्स सेंटर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
 
भाजीपाला विक्रेत्यांनी नगरपालिकेच्या महात्मा फुले भाजी मंडई व्यवसाय करावा . अन्यथा प्रशासन कडून फायदेशीर कारवाई करण्यात येईल असे मुख्याधिकारी संदीप भोळे यांनी सांगितले. नगरपालिका नेतृत्वाखाली अमित रोकडे , महादेव राबडे , परेश कुंभार , दत्तात्रेय सुतार  , बाळू भोसले , दिप्ती कुलकर्णी , प्रकाश वनवे , ज्ञानेश्वर गुणवरे , सुप्रिया भंडारे,  प्रतीक्षा निकुंबे, प्रणाली अंकुश , रेश्मा नायकोडी,  राहुल सैद , विकास वाघमारे , पंकज भोसले,  अभय मिंढे पोलीस उपनिरीक्षक संदीप मोरे ठाण्यामालदार सागर शिंदे व आदी या कारवाईत सहभाग घेतला. 

Related Articles