E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
महाराष्ट्र
माळशेज परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात तिघे जखमी
Wrutuja pandharpure
03 Feb 2025
ओतूर
, (वार्ताहर) : जुन्नर तालुक्यातील माळशेज परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तीन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
रविवारी पिंपळगावजोगा येथील सुनील बबन निमसे (वय ४२) हे घराबाहेर असलेल्या शेडमध्ये झोपले असताना अचानक पहाटे ४.४५ च्या सुमारास बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले.
दुसर्या घटनेत रोहोकडी येथील अभय विलास घोलप (१९) व चुलते रखमा सखाराम घोलप (६१) हे विद्युत पंप चालू करण्यासाठी दुचाकीवरून जात असता सकाळी ६.३० च्या सुमारास रस्त्याच्या बाजूला दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला करून त्यांना जखमी केले. जखमी व्यक्तींना तात्काळ ओतूर येथील आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार घेऊन पुढील उपचारासाठी मंचर येथील ग्रामीण रुग्णालय नेण्यात आले.
ओतूर वनपरिक्षेत्र अधिकार्यांनी घटनास्थळाची पाहाणी करून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याचे आश्वासन दिले. पहाटे उघड्यावर शौचालयास जाऊ नये, रात्री घराबाहेर झोपू नये व तसेच बिबट प्रवण क्षेत्रातून जात असताना वाहनाचे हॉर्न मोठ्याने वाजवणे, जेणेकरून रस्त्याच्या बाजूला दबा धरून बसलेले वन्यप्राणी त्याची जागा बदलतील, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
Related
Articles
चीनमध्ये दरड कोसळली;३० नागरिक अडकले
09 Feb 2025
जिल्हा रुग्णालयात केमो सुविधा बंद
09 Feb 2025
व्हॉट्सऍप कट्टा
15 Feb 2025
सावंत यांच्या मुलाच्या अपहरणाचे रंगले नाट्य
11 Feb 2025
लष्करप्रमुखच पाकिस्तानचे सत्ताधीश
12 Feb 2025
बांधकाम व्यावसायिकासह सात जणांविरूद्ध फसवणूकीसह अॅट्रॉसिटीचा गुन्हा
13 Feb 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
संस्कृत वक्तृत्व स्पर्धेत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची अमृता करंबळेकर प्रथम
2
आतिशी यांनी गड राखला
3
दिल्ली आपत्तीपासून मुक्त : मोदी
4
आरटीई प्रवेशासाठी ऑनलाइन सोडत जाहीर
5
पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष
6
लय आणि अचूकतेचं मिश्रण