E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
ऑनलाइन वीजबिल भरा; स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच जिंका!
Wrutuja pandharpure
03 Feb 2025
पुणे
: सलग तीन किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांपासून वीजबिल ऑनलाइन पद्धतीने भरणार्या लघुदाब वीजग्राहकांसाठी महावितरणकडून जानेवारी ते मे महिन्याच्या कालावधीसाठी ‘लकी डिजिटल ग्राहक योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेत प्रत्येक उपविभाग स्तरावर पाच बक्षिसे देण्यात येणार असून, एकूण तीन लकी ड्रॉ काढण्यात येणार आहेत. यात विजेत्या ग्राहकांना स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच असे बक्षीस देण्यात येणार आहे.
पुणे प्रादेशिक विभागातील १५९ उपविभागांसाठी २ हजार ३८५ बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. ही योजना विद्यमान कर्मचार्यांसाठी लागू नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. ज्या लघुदाब वीजग्राहकांनी सलग तीन किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांपासून वीजबिलांचा ऑनलाइन पद्धतीने भरणा केला आहे. तसेच दि. १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत एकदाही वीजबिल किंवा त्याचा ऑनलाइन भरणा केलेला नाही अशा ग्राहकांसाठी ही योजना आहे. मागील महिन्याच्या वीजबिलाची थकबाकी १० रुपयांपेक्षा अधिक नसलेल्या ग्राहकांना १ जानेवारी ते ३१ मेपर्यंत सलग तीन किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांत ऑनलाइन पद्धतीने वीजबिल भरून योजनेत सहभागी होता येणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.
एप्रिल, मे आणि जून महिन्यात संगणकीय पद्धतीने लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. त्याचा निकाल संबंधित महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महावितरणच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात येणार असून, विजेत्या ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरदेखील बक्षीस जिंकल्याची माहिती दिली जाणार आहे. ग्राहकांनी लकी डिजिटल ग्राहक योजनेबाबत अधिक माहितीसाठी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर mahadiscom.in भेट द्यावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
Related
Articles
गोध्रा हत्यांकांडातील आरोपीसह परराज्यातील टोळी पकडली
03 Feb 2025
अवजड वाहनांना पुण्यात मर्यादित वेळेत बंदी
07 Feb 2025
पुण्यातही झोपडपट्टीतील व्यावसायिक गाळ्यांवर कर आकारणार
05 Feb 2025
कापूस पिशव्यांच्या खरेदीत ४१ कोटींचा भ्रष्टाचार
07 Feb 2025
योजनेला कात्री; पण प्रसिद्धीचा हव्यास सुटेना!
06 Feb 2025
आरटीई प्रवेश; प्रलोभनांना बळी पडू नका
06 Feb 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
असर’च्या अहवालातून शैक्षणिक गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
2
‘करारांचा’ लाभ किती?
3
वेतन वाढेल; जबाबदारीचे काय?
4
कनिष्ठ, मध्यम वर्गाचा अपेक्षाभंग!
5
भारतीय मुलींनी जिंकला विश्वचषक
6
पृथ्वीराज मोहोळ ‘महाराष्ट्र केसरी’