जपानी वक्तृत्व स्पर्धेत कनका पेडणेकर प्रथम   

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा सन्मान

पुणे : मोंबुशो स्कॉलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (मोसाई ) तर्फे आयोजित ३६व्या जपानी भाषेच्या वक्तृत्व स्पर्धेत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या जपानी  भाषा विभागातील बी.ए. जपानी भाषा द्वितीय वर्षात शिकणार्‍या कनका देवेंद्र पेडणेकर हिने पश्चिम विभागातून वरिष्ठ गटात प्रथम पारितोषिक मिळवले. हे बक्षीस तिला विभागून मिळाले आहे. 
 
पश्चिम विभागाची स्पर्धा जलताप पुणे, निहोनजिनकाई आणि कॉनस्युलेट जनरल ऑफ जपान, मुंबई तर्फे आयोजित करण्यात आली. पारितोषिकाचे स्वरूप सन्मानचिन्ह व रोख रक्कम असे होते.हे पारितोषिक टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या जपानी भाषा विभागासाठी अभिमानाचा क्षण आहे. विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक आणि कुलगुरू डॉ. गीताली टिळक यांनी जपानी भाषा विभाग व कनका पेडणेकर यांचे अभिनंदन केले.

Related Articles