कॅनडाच्या पंतप्रधानांची निवड मार्चमध्ये होणार   

ओटावा : कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन त्रुदो यांनी नुकताच पदाचा आणि पक्ष नेते पदाचा राजीनामा दिला आहे. ते काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्यरत असून लिबरल पक्षाच्या नव्या नेत्याची आणि पंतप्रधान पदाच्या उमेदवाराची निवड ९ मार्च रोजी केली जाणार आहे. 
 
नेता निवडीसाठी लिबरल पक्षात निवडणूक घेतली जाणार आहे. माजी बँकर मार्क कार्ने, माी अर्थमंत्री क्रिस्टिया फ्रीलँड यांची नावे पदासाठी आघाडीवर आहेत. गेल्या महिन्यात फ्रिलँड यांनी अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे त्रुदो यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला होता. आता नव्या  नेत्याची निवड ९ मार्च रोजी केली जाणार असल्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष सचित मेहता यांनी दिली.  

Related Articles