कहो ना प्यार है ! रौप्यमहोत्सवी वर्षात   

हृतिक रोशनकडून आठवणींनी उजाळा

मुंबई : कहो ना प्यार है ! चित्रपटाने रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केले. हृतिक रोशन यांची प्रमुख भूमिका होती. त्याच्या आठवणींना ह्रतिकने उजाळा दिला. वडील आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांनी चित्रपट शाहरुख खान, सलमान खान आणि अमिर खान यांच्यासाठी तयार केला होता, असे मला वाटले. पण, मला ती भूमिका मिळाल्यामुळे अत्यानंद झाल्याचे त्याने सांगितले. 
 
ह्रतिक रोशनने या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. २५ वर्षे आता चित्रपटाला पूर्ण झाली आहे. तो रौप्यमहोत्सवी वर्षौंत पदार्पण केले आहे. त्याचा आनंदोत्सव चित्रपटगृहात पुन्हा प्रदर्शित करुन साजरा केला. गुरूवारी रात्री रेडिओ नशाने तो प्रदर्शित करुन देशभरातील चाहत्यांंची मने जिंकली.  अभिनेत्री अमिषा पटेलसाठी चित्रपट महत्त्वाचा ठरला होता. यानंतर किंग अंकल, करण अर्जुन, कोयला चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून हृतिक  होता. तेव्हा चित्रपट निर्मितीवर त्याने अनेकदा वडिलांशी चर्चा केली. कहो ना  प्यार है चित्रपटासाठी तूच योग्य अभिनेता असल्याचे तेव्हा मला त्यांनी सांगितले. वडील माझ्यासाठी चित्रपट तयार करत असल्याचे ऐकून तेव्हा मला धक्का बसला होता. चर्चा करत असताना मला वाटले की ते शाहरुख खान, अमिर खान आणि सलमान खान यांच्यासाठी तो तयार करत असावेत. चित्रपटातील नायक कोण असेल ? असा प्रश्न विचारताच ते म्हणाले, तुझ्याशिवाय अन्य कोणी भूमिकेसाठी योग्य वाटत नाही. 

Related Articles