कुंभवाणी एफएम रेडिओ सेवा सुरू   

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील महाकुंभ मेळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. त्या अंतर्गत प्रसार भारतीने देखील आता पुढाकार घेतला असून कुंभवाणी एफ एम रेडिओ सेवा सुरू केली आहे. 
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते कुंभवाणीचे उद्घाटन सर्किट हाऊसमध्ये शुक्रवारी झाले. प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ते आले होते. प्रसार भारतीने ओटीटीच्या धर्तीवर कुंभवाणी एफ एम वाहिनी सुरू केली आहे. १०३.५ मेगाहर्टझवर ती ऐकता येणार आहे. आजपासून २६ फेब्रुवारीपर्यत ती कार्यरत राहणार आहे. पहाटे ५ वाजून ५५ मिनिटांपासून ते रात्री १० वाजून ५ मिनिटांपर्यंत सेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. कुंभवाणीचा लाभ मेळ्यात सहभागी होणार्‍या प्रत्येकाला आणि दुर्गम खेडी आणि गावांना देखील होणार आहे. जे मेळ्यात सहभागी होणार नाहीत. त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचविण्याचे कार्य कुंभवाणी करणार आहे. 

Related Articles