गेले वर्ष ठरले अति उष्ण!   

 

सरासरी तपमान दीड अंशाजवळ; धोक्याची घंटा
 
नवी दिल्ली : जागतिक तपमान वाढीचा फटका पृथ्वीला मोठा बसला आहे. गेले वर्ष प्रथमच अति उष्णतेचे ठरले. पृथ्वीचे सरासरी तपमान दीड अंशाच्या आसपास पोहोचले आहे, असे हवामान विषयक संशोधन करणार्‍या कोपर्निकस संस्थेने अहवालात नमूद केले आहे.
 
औद्योगिक क्रांतीनंतर तपमानात वाढ झाल्याची माहिती युरोपियन हवामान विषयक संस्था कोपर्निकसने शुक्रवारी दिली.  जानेवारी ते जून २०२४ दरम्यान, प्रत्येक महिना सर्वाधिक उष्ण होता. २०२३ ची तुलना करता  जुलै ते डिसेंबर अखेरचा काळ ऑगस्ट महिना वगळता उष्ण होता. कोपर्निकस वातावरणातील बदल सेवा संस्थेने स्पष्ट केले की, २०२४ हे वर्ष सर्वाधिक उष्ण ठरले आहे. संस्थेने १८५० पासून २०२४ अखेरच्या तपमानातील वाढीचा अभ्यास केला. त्याचे अहवाल तपासून निष्कर्ष काढला आहे. जागतिक तपमान १५.१ अंश होते.  १९९१-२०२० च्या तुलनेत त्यात ०.७२ अंशानी वाढ झाली. २०२३ चा विचार करता यंदा ०.१२ टक्के वाढ झाली. संशोधकांनी सांगितले की, सरासरी तपमान २०२४ मध्ये १.६० अंश होते. १८५० -१९०० चा विचार करता वातावरणात मानवी हस्तक्षेप  वाढला. त्यामध्ये जैव इंधनाचा वापर मोठा झाल्याने तपमान वाढत गेले. एकंदरीत जागतिक तपमान सरासरी दीड अंशाच्या आसपास पोहोचले आहे. पॅरिस करारानुसार तपमान दीड अंशावर वाढू नये, अशीं खबरदारी घेण्याचा सल्ला दिला होता. आता ते त्या जवळपास आले असल्याचे धोक्याची घंटा वाजू लागली आहे. सतत संपदा क्लायमेट फाऊंडेशनचे संचालक हरजित सिंग म्हणाले, जगाने वातावरणातील बदल गेल्या वर्षात मोठे अनुभवले आहेत. त्या उष्णतेची लाट, महापूर, अतितीव्र वादळे यांचे प्रमाण वाढले आहे. या तिन्ही बाबी वारंवार पृथ्वीवर घडत आल्या आहेत. तपमान वाढ रोखण्यासाठी आतापासून उपाययोजना करण्यावर भर देणे गरजेचे बनले आहे. समाजातील प्रत्येक घटकांनी त्याची सुरुवात स्वत:च्या घरी, शहरांपासून केली पाहिजे. पायाभूत आणि परिवर्तनीय व्यवस्थापन करताना पाणी, अन्न आणि ऊर्जा यांचा समतोल राखण्याची गरज आहे. जैव इंधनाचा वापर काटेकोरपणे टाळून स्वच्छ ऊर्जा वापरण्यावर लक्ष केंद्रित करावे. श्रीमंत देशांनी आपली जबाबदारी म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे. त्यासाठी ठोस उपायोजनांची अंमलबजावणी करावी संशोधकांनी सांगितले की, २०२४ मध्ये हरित वायूची पातळी वातावरणात अधिक वाढली आहे. त्यात कार्बन डाय ऑक्साईड ते २.९ एवढे (पीपीएम) झाले आहे. मिथेन वायूचे प्रमाण ३ एवढे (पीपीबी)) वाढले आहे.  आर्क्टिक्ट आणि अंटार्टिका समुद्रातील बर्फ पृथ्वीचे तपमान थंड ठेवण्यास मोठी मदत करतात. ते सलग दुसर्‍या वर्षात वितळत चालले असल्याचे स्पष्ट होत आहे.
 

 

Related Articles