संसर्गजन्य आजार, संशोधन प्रयोगशाळा बंगळुरूमध्ये सुरू   

 

बंगळुरू : कर्नाटकाची राजधानी बंगळुरू येथे संसर्गजन्य आजारावर संशोधन आणि निदान करण्याची प्रयोगशाळा सुरू केली आहे. दक्षिण भारतातील ती पहिली प्रयोगशाळा आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री शरण प्रकाश पाटील यांनी शुक्रवारी दिली. 
 
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने बंगळुरू येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि संशोधन संस्थेची निवड प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी केली. त्यातून संसर्गजन्य आजार, संशोधन आणि निदान करण्यास मोठी चालना मिळणार आहे. त्याचा लाभ समाजातील सर्व घटकांना होणार आहे. प्रयोगशाळेत नमुने तपासले जाणार आहेत. त्यामुळे ते अन्यत्र चाचणीसाठी पाठविण्याची गरज भासणार नाही, असे पाटील यांनी सांगितले. केंद्र सरकारने संसर्गजन्य आजारावर संशोधन आणि निदान प्रयोगशाळा सर्व राज्यांतील सर्व वैद्यकीय महाविद्यालयात सुरू करण्याचे ठरविले आहे. त्यात जिवाणू, मायक्रोलॉजी आणि प्ररासीटॉलॉजीसंबंधित विषाणूजन्य संशोधन आणि निदान प्रयोगशाळांचा समावेश आहे. दरम्यान, या प्रसंगी ट्रामा आणि इमर्जन्सी केअर सेंटरमध्ये शरण पाटील यांच्या हस्ते मोनिझ कॅथ लॅब, डीएसए कॅथ लॅब सुरू केली आहे.  

Related Articles