मालमोटार दरीत कोसळून दोन भावांचा मृत्यू   

जम्मू : जम्मू आणि काश्मीरमध्ये अवजड साहित्याची वाहतूक करणारी मालमोटार दरीत कोसळून दोन भावांचा मृत्यू झाला आहे. रामबन जिल्ह्यातील  जम्मू -श्रीनगर महामार्गावर अपघात झाला होता. जम्मूहून काश्मीरकडे लोखंडी कांबीची वाहतूक मालमोटारीतून  केली जात होती.  तेव्हा मंकी मॉर्थ येथील बॅटरी चेष्मा परिसरात मंगळवारी रात्री मालमोटार आली आणि ती दरीत कोसळली. यानंतर राज्य आपत्ती प्रतिक्रिया दलाने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी मदतकार्य राबवले. तेव्हा ४०० फूट खोल दरीत मालमोटार पडल्याचे दिसून आले. घटनास्थळी दोघांचे मृतदेह सापडले. यासीर आणि दानिश यांचा मृत्यू झाला असून ते उत्तर काश्मीरचे रहिवासी आहेत.
 

Related Articles