काश्मीरमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त   

कुपवाड्यातील जंगलात कारवाई

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. त्यामध्ये हत्यारे आणि दारुगोळ्याचा समावेश असल्याची माहिती अधिकार्‍यांनी शुक्रवारी दिली. उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील टीपी जंगल परिसरात सुरक्षा दलाने शोध मोहीम राबविली होती. तेथे शस्त्रसाठा लपवून ठेवल्याची माहिती मिळताच छापे टाकून तो जप्त केला. गेले तीन दिवस शोध मोहीम सुरू होती. त्यात हत्यारे आणि दारुगोळा जप्त केला आहे. त्यामध्ये पिस्तुले, मॅगिझिन, आठ गोळ्या आणि पाच हातबाँब आणि एके ४७ रायफलीच्या २७० गोळ्या जप्त केल्या. 

Related Articles