उत्तर प्रदेशात विद्यार्थिनीची वसतिगृहामध्ये आत्महत्या   

लखनौ : उत्तर प्रदेशातील लखानौ येथील एका खासगी विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेणार्‍या २० वर्षाच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. तिचा मृतदेह वसतिगृहातील खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. 
 
एमेटी विद्यापीठात ती द्वितीय वर्षात कायद्याचे शिक्षण घेत होती. शुक्रवारी चनहट पोलिस ठाण्यात तिचा मृतदेह खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत असल्याची माहिती देण्यात आली होती., अशी माहिती उपायुक्त शशांक सिंग यांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करुन मृतदेह पुढील तपासणीसाठी पाठवला आहे. घटनेची माहिती तिच्या कुटुंबीयांना दिली आहे., असेही अधिकार्‍यांनी सांगितले.

Related Articles