E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
शहरातील तपमानात आजपासून वाढ
Wrutuja pandharpure
10 Jan 2025
पुणे
: मागील आठवडाभरापासून घटलेल्या तपमानामुळे सायंकाळनंतर हवेत गारवा वाढत होता. त्यामुळे थंडीत वाढ झाली होती. मात्र आज (शुक्रवार) पासून किमान तपमानात वाढ होणार असल्याने थंडीत घट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. गुरूवारी शहरात २९ अंश कमाल व १०.९ अंश किमान तपमानाची नोंद झाली.
तपमानात वाढ झाल्याने हवेतील गारवा कमी झाला आहे. तसेच येत्या दोन दिवसांत किमान तपमानात २ ते ३ अंशाने वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे हवेतील गारवाही गायब होणार आहे. त्यानंतर पुढील चार दिवसांत शहर आणि उपनगरातील किमान तपमान १५ अंशापर्यंत वाढणार आहे. त्यामुळे पुणेकरांना थंडीपासून दिलासा मिळणार आहे. दिवसभर थंडी गायब होणार असली, तरी रात्रीच्या किमान तपमानात मात्र घट कायम राहणार असल्याने रात्री हवेत काही प्रमाणात गारवा टिकून राहू शकतो, असेही हवामान विभागाकडून नमूद करण्यात आले आहे.
शहर आणि उपनगरात काल सकाळी हवेत गारवा होता. त्यामुळे पहाटेपासून सकाळी आठपर्यंत थंडी जाणवत होती. त्यानंतर मात्र ऊन पडले होते. दुपारी सर्वत्र ऊन पडल्याने हवेतील गारवा कमी झाला होता. सायंकाळी आकाश अंशत: ढगाळ झाल्याने काही अंशी हवेत गारवा जाणवत होता. रात्री किमान तपमानात घट झाल्याने काही प्रमाणात थंडी जाणवत होती. मात्र मागील आठवडाभराच्या तुलनेत थंडी कमी झाल्याने रात्री तसेच सकाळी नागरिक मोठ्या प्रमाणात फिरण्यासाठी घराबाहेर पडत आहेत.
दरम्यान, गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तपमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. मराठवाडड्यात काही ठिकाणी किमान तपमानात सरासरीच्या तुलनेत किचिंत घट झाली. काल राज्यात नागपूर येथे नीचांकी ८.२ अंश किमान तपमानाची नोंद झाली. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही भागात आज आणि उद्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. विदर्भात मात्र हवामान कोरडे असणार आहे.
Related
Articles
रजपूत झोपडपट्टी एरंडवणे रस्ता रुंद होणार
08 Feb 2025
राज्यात आरोग्यविषयक खर्चाचे सर्वेक्षण होणार
08 Feb 2025
अमेरिकेतून २०० भारतीय परत
05 Feb 2025
उद्योजकांकडून वसुली करणार्यांना ‘मोकाका’ लावा
07 Feb 2025
वाचक लिहितात
08 Feb 2025
विठ्ठल-रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा
03 Feb 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
असर’च्या अहवालातून शैक्षणिक गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
2
‘करारांचा’ लाभ किती?
3
वेतन वाढेल; जबाबदारीचे काय?
4
कनिष्ठ, मध्यम वर्गाचा अपेक्षाभंग!
5
पृथ्वीराज मोहोळ ‘महाराष्ट्र केसरी’
6
भारतीय मुलींनी जिंकला विश्वचषक