E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
आरोग्य यंत्रणा आणि प्राथमिक शिक्षण सुविधांचे करणार बळकटीकरण : जिल्हाधिकारी
Wrutuja pandharpure
10 Jan 2025
पुणे
: जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण सुविधांच्या बळकटीकरणाला प्राधान्य द्यायचे असल्याने त्यादृष्टिने सन २०२५-२६ चे प्रस्ताव तयार करण्यासाठी यंत्रणांनी कामाला लागावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्देश दिल्याचे ते म्हणाले.
जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सर्व कार्यान्वयीन यंत्रणांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
डुडी म्हणाले, जिल्ह्यातील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे वगळता अन्य केंद्राच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे, जुन्यापैकी ज्या दुरुस्ती होण्यासारखी असतील त्यांची डागडुजी आणि दुरुस्ती करावी, इमारतीचे निर्लेखन आणि तेथे नवीन इमारती बांधण्याचा आराखडा तयार करावा. उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयांच्या जुनाट इमारतींच्या जागी देखील नवीन इमारत बांधण्याच्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करावेत.
प्राथमिक शिक्षणात ३०४ केंद्र शाळा असून, त्याअंतर्गत एक आदर्श शाळा करण्यासाठी प्रत्येक केंद्रांतर्गत सर्वात मोठी क्रीडांगण असलेली जास्त शिक्षक संख्या आदी निकषांवर एक शाळा निवडायची आहे. अंगणवाडी केंद्रांना जागा नसल्यास जवळच्या प्राथमिक शाळेच्या आवारात उभारण्यात यावे, असा शासनाचा निर्णय आहे. इमारतीसाठी नवीन आदर्श आराखडा तयार केला असून, त्यासाठी निधी कमी पडल्यास कंपन्यांच्या सामाजिक राखीव निधीतून घेण्याच्या अनुंषगाने प्रयत्न करावेत.
यामुळे प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, अंगणवाडी बांधवाना त्या चांगल्या आकर्षक वाटण्याच्या दृष्टीने त्याचे आराखडे बनविण्यात येणे आवश्यक आहे. त्यासाठी वास्तुविशारदांची एक स्पर्धा होऊन त्यापैकी एक आदर्श आराखडा निवडून त्यानुसार बांधकाम करण्याचे नियोजन करण्यात यावे, असेही सांगून डुडी म्हणाले, जिल्ह्यात रोजगाराच्या अनुषंगाने नाविन्यपूर्ण क्षेत्र समूह (क्लस्टर्स) तयार करण्यावर भर द्यायचा आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील म्हणाले, जुन्नर तालुक्यात हिरडा क्लस्टर्स करणे शक्य असून, त्यादृष्टिने अधिकार्यांनी प्रयत्न करावेत. यावेळी इंदलकर यांनी सन २०२४-२५ च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या अनुषंगाने विविध विभागांच्या प्रस्तावांना दिलेली प्रशासकीय मान्यता, वितरित केलेला निधी या अनुषंगाने सादरीकरण केले, त्याबााबत यंत्रणांच्या प्रमुखांनी खर्चाच्या अनुषंगाने माहिती दिली.
Related
Articles
ओलिसांची सुटका करा ; अन्यथा नरक भोगाल
08 Jan 2025
दोन अल्पवयीन मुलांवर अत्याचार
06 Jan 2025
अपघात टाळण्यासाठी ‘जीपी २’चा वापर करणार
10 Jan 2025
पत्रकार दिनानिमित्त टिमवितर्फे व्याख्यान
07 Jan 2025
निगडी-यमुनानगरमध्ये २४ तास पाणीपुरवठा करा
09 Jan 2025
ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वी ढोलांचा आवाज घुमणार
07 Jan 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
स्वयं अध्ययनातून परिणामकारक शिक्षण
2
डोनाल्ड ट्रम्प यांना दिलासा
3
आरटीई प्रवेशांसाठी पालकांनी दलालांपासून सावध रहावे
4
‘ह्यूमन मेटान्यूमो‘ म्हणजे काय?
5
कुंभमेळा आणि सुरक्षा कवच
6
नवा संघर्ष (अग्रलेख)