पुणे : महाराष्ट्र तंत्रज्ञान विद्यापीठ (सीओईपी) आणि भाऊ इनोव्हेशन अँड आंत्रप्रेन्योरशिप सेल यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे स्टार्टअप महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यंदाचे हे सातवे वर्ष आहे. महोत्सवाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. ११ आणि १२ जानेवारी रोजी महोत्सव असून ‘व्हॉएज ऑफ व्हिजनरीज’ या संकल्पनेवर आधारित आहे. युवांमध्ये उद्योजकतेचा उत्साह जागृत करण्याच्या उद्देशाने आयोजित महोत्सवात नवउद्योजकांना आपली स्टार्टअप कल्पना सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळणार आहे. यंदाच्या महोत्सवात सौरभ गाडगीळ, रवी पंडित, उद्योजक संजय घोडावत, समीर कामत यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. महोत्सवात डेमोक्रॅट व्हॅली: ही स्पर्धा घेण्यात येईल. पेटंट धारकांसाठी विशेष विभागात संशोधकांना त्यांच्या प्रकल्प प्रदर्शन मांडण्याची संधी मिळणार आहे. नवउद्योजकांसाठी एक प्रेरणादायी आणि उद्योजकीय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी व्यासपीठ ठरणार आहे.
Fans
Followers