E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
रविवार केसरी
कुंभमेळा आणि सुरक्षा कवच
Wrutuja pandharpure
09 Jan 2025
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी असा ४४ दिवस महाकुंभ मेळा भरणार आहे. हा जगातील सर्वात मोठा सांस्कृतिक
आणि आध्यात्मिक मेळावा होणार असून, यामध्ये ४५० दशलक्षाहून अधिक भाविक येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा कार्यक्रम सुरक्षित आणि संस्मरणीय व्हावा, यासाठी उत्तर प्रदेश सरकारने कोणतीही कसर सोडली नाही.
गुप्तचर यंत्रणा सक्रिय
भाविकांच्या सुरक्षेसाठी महाकुंभ नगरीतील मंदिरे आणि महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा उपाययोजना मजबूत करण्यात आल्या आहेत. महाकुंभमेळा परिसर, प्रयागराज आणि शेजारील जिल्ह्यांमध्ये गुप्तचर यंत्रणा सक्रिय करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात प्रवेश करणार्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी करण्यासाठी चौक्या उभारण्यात आल्या आहेत. संशयास्पद हालचालींवर नजर ठेवण्यासाठी आणि संपूर्ण प्रदेशात दक्षता ठेवण्यासाठी गुप्तचर पथकेही तैनात करण्यात आली आहेत. उत्तर प्रदेश सरकारने कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्वसमावेशक योजना तयार केली आहे.
अग्निसुरक्षा
अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा विभागाने आगीच्या घटना रोखण्यासाठी आणि हाताळण्यासाठी चार आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर्स प्रगत वैशिष्ट्यांंसह सज्ज केले आहेत. ॒हे एक आधुनिक अग्निशमन वाहन आहे. मोठ्या आणि विस्तृत तंबूंची उभारणी लक्षात घेऊन हे टॉवर्स तैनात करण्यात आले आहेत. हे टॉवर ३५ मीटरपर्यंतच्या उंचीवर आणि ३० मीटरच्या लांबीपर्यंत पाण्याचा मारा करू शकतात. अग्निसुरक्षेसाठी एकूण १३१.४८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे, ज्यामुळे प्रत्येक तंबूमध्ये ३५१ अग्निशमन वाहने, ५०+ अग्निशमन केंद्रे, २ हजारहून अधिक प्रशिक्षित कर्मचारी, २० अग्निशमन चौक्या आणि अग्निशमन उपकरणे तैनात करण्यात आली आहेत.
‘हाय-टेक’ सुरक्षा साधने
उत्तर प्रदेश सरकारने यंदाच्या महाकुंभाला डिजिटल महाकुंभ बनवण्यास प्राधान्य दिले आहे. यामध्ये हाय-टेक सुरक्षा साधनांचा समावेश आहे. महाकुंभ क्षेत्राचे निरीक्षण करण्यासाठी एआय प्रणालीवर चालणारे ड्रोन, पवित्र संगम स्नानादरम्यान सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अंडरवॉटर ड्रोन, हे ड्रोन नद्यांच्या खाली २४/७ पाळत ठेवतील. हे अत्याधुनिक अंडरवॉटर ड्रोन १०० मीटर खोलवर पाळत ठेवणार आहेत.
सायबर सुरक्षा
जगभरातून येणार्या भाविकांना सायबर सुरक्षा प्रदान करण्यासाठी एक सायबर सुरक्षा पथक स्थापन करण्यात आले आहे.बहु-आपत्ती प्रतिसाद वाहनेआपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सुसज्ज बहु-आपत्ती प्रतिसाद वाहने तैनात करण्यात आली आहेत. या वाहनामध्ये नैसर्गिक आपत्तींपासून ते रस्ते अपघातापर्यंतची परिस्थिती हाताळण्यास सक्षम असलेली अत्याधुनिक उपकरणे आहेत. यात १० ते २० टन क्षमतेची उचलणारी लिफ्टींग बॅग, ढिगार्याखाली दबलेल्या व्यक्तींना वाचवणे आणि १.५ टन वजनाच्या जड वस्तू उचलण्यासाठी विशेष मशीन्सचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, आणीबाणीच्या वेळी मोडतोड करण्यासाठीच्या साधनांनीही हे वाहन सुसज्ज आहे.
रिमोट-नियंत्रित लाइफ बॉय
सुरक्षितता वाढविण्यासाठी रिमोट-नियंत्रित लाइफ बॉयची मोठ्या प्रमाणावर तैनात सुरू करण्यात आली आहे. ही उपकरणे वेगाने कोणत्याही ठिकाणी पोहोचू शकतात आणि आपत्कालीन परिस्थितीत व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी पोहोचवू शकतात.
सात स्तरीय सुरक्षा
कुंभमेळ्याच्या बाहेरील घेर्यापासून आतील गाभार्यापर्यंत सात स्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे. प्रयागराज आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये व्यापक शोध मोहीम राबवण्यात आली आहे, तसेच हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, फेरीवाले आणि अनधिकृत वस्त्यांची सखोल तपासणी करण्यात आली आहे. जत्रेच्या मैदानात आणि प्रयागराजमध्ये प्रवेश करणार्या वाहनांची कडक तपासणी केली जाणार असून, विनापरवाना वाहनांना बंदी असेल.
तात्पुरती पोलिस ठाणी आणि चेकपोस्ट
प्रयागराज पोलिसांनी शहरी आणि ग्रामीण भागात तात्पुरती पोलिस ठाणी आणि चेकपोस्ट उभारले आहेत. ५७ पोलिस ठाणी, १३ तात्पुरती स्थानके आणि २३ चेकपॉइंट उभारण्यात आले आहेत.
सर्वसमावेशक दल
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलासह १० हजारहून अधिक पोलिस कर्मचारी कुंभमेळ्याच्या सुरक्षेसाठी सज्ज आहेत. ७०० हून अधिक बोटींवर पीएसी, एनडीआरएफ आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे कर्मचारी २४ तास तैनात असतील. याशिवाय निमलष्करी दल, बॉम्ब नाशक पथकेही तैनात असणार आहेत.
जल पोलिस पथके
गंगा आणि यमुना नदीकाठी कोट्यवधी भाविकांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी, विशेषत: संगम परिसरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज जल पोलिस कर्मचार्यांची मोठी तुकडी तैनात करण्यात आली आहे.
हरवले-सापडले केंद्र
मेळा परिसरात पोलिसांकडून हरवले-सापडले केंद्र स्थापन करण्यात येत आहे. सर्व केंद्रांवर हरवलेल्या यात्रेकरूंची डिजिटल नोंद होईल आणि संबंधित यात्रेकरूंना त्यांच्या नातेवाईकांकडे सोपविण्यासाठी यातील पथके प्रयत्नशील राहतील. हरवलेल्या आणि सापडलेल्या व्यक्तींच्या समाजमाध्यमावरही पोस्ट केल्या जाणार आहे.
Related
Articles
यवतमाळमध्ये पट्टेरी वाघ मृतावस्थेत
10 Jan 2025
श्रीमंत बाजीराव पेशवे आणि नानासाहेब पेशवे यांच्या स्मारकाचे काम समाधानकारक : चंद्रकांत पाटील
11 Jan 2025
वाचक लिहितात
13 Jan 2025
कात्रजमध्ये ४३ लाखांचे अमली पदार्थ जप्त
12 Jan 2025
ब्रह्मपुत्रेवरील धरणाचा भारतावर विपरीत परिणाम नाही : चीन
07 Jan 2025
मुंबईमध्ये ‘ह्यूमन मेटान्युमो’चा पहिला रूग्ण
09 Jan 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
स्वयं अध्ययनातून परिणामकारक शिक्षण
2
डोनाल्ड ट्रम्प यांना दिलासा
3
आरटीई प्रवेशांसाठी पालकांनी दलालांपासून सावध रहावे
4
‘ह्यूमन मेटान्यूमो‘ म्हणजे काय?
5
नवा संघर्ष (अग्रलेख)
6
शेअर बाजारात उसळी