E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
रविवार केसरी
मृत्यूचे हवाई द्वार!
Wrutuja pandharpure
05 Jan 2025
अजय तिवारी
जगात सर्वात वेगवान प्रवासी वाहतुकीसाठी विमानांचा वापर वाढला आहे. जगभरात नागरिकांच्या उत्पन्नात होत वाढ होत असल्याने प्रवाशांचा विमान प्रवासाकडे कल वाढला आहे; परंतु त्याचबरोबर विमान अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तंत्र कितीही प्रगत झाले असले, तरी अपघात रोखण्यात ते फार यशस्वी झाले असे म्हणता येत नाही.
मानवी चुका, तांत्रिक दोष आणि निसर्ग अशा अनेक कारणामुळे अपघात होतात. गेल्या आठवड्यात अझरबैजानचे विमान जसे रशियाने चुकून पाडले, तशा चुकाही विमान प्रवाशांच्या मृत्यूला कारणीभत होत असतात. डिसेंबर महिना हा तर विमान प्रवाशांसाठी जणू काळच बनून आला. डिसेंबरमध्ये सहा विमान अपघात झाले. त्यात २३४ जणांचा बळी गेला. २०२४ मध्ये झालेल्या विमान अपघातात ४०२ प्रवाशांचा प्रवास अखेरचा ठरला.
दक्षिण कोरियातील मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर १८१ प्रवाशांना घेऊन येणार्या जेजू एअरच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या घटनेत १७९ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर दोघांना वाचवण्यात यश आले. विमान वाहतूक क्षेत्रातील सुरक्षा प्रोटोकॉल आणि तांत्रिक समस्यांबाबत आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बँकॉकहून परतणार्या या विमानाचा गिअर लँडिंगच्या वेळी उघडला नाही, त्यामुळे विमान धावपट्टीवरून घसरले आणि थेट काँक्रीटच्या सुरक्षा भिंतीला धडकले. आदळल्यानंतर विमानातून आगीचा मोठा लोळ बाहेर आला. त्यामुळे १७९ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. असे सांगितले जात आहे.
पक्षी विमानाला धडकल्याने अपघात झाल्याचे अन्य एक कारण सांगितले जाते दक्षिण कोरियाच्या मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळाचा इतिहास असा आहे, की तेथे यापूर्वी चिमण्या विमानांना धडकून अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे.
अधिकार्यांनी सांगितले, की हवाई वाहतूक नियंत्रकांनी अपघाताच्या काही मिनिटांपूर्वीच विमानाला पक्षी धडकण्याच्या जोखमीबद्दल इशारा दिला होता. बचावलेल्या दोघांपैकी एकाने पक्ष्यांच्या धडकेचा उल्लेख केला होता; मात्र हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा शोध घेतला जात आहे.
अपघाताच्या वेळी विमानात एकूण १८१ प्रवासी होते. दोन कर्मचार्यांना वाचवण्यात आले आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. आगीत ८४ महिला, ८२ पुरुष आणि ११ अन्य लोक जळून खाक झाले. त्यातील फक्त ६५ जणांची ओळख पटली आहे. कर्मचार्यांनी विमानाच्या ब्लॅक बॉक्समधून फ्लाइट डेटा आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर मिळवले आहेत. या सर्वांची सरकारी तज्ज्ञांकडून चौकशी केली जाईल.
कोरिया एअरपोर्ट कॉर्पोरेशनने संसदेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार, दक्षिण कोरियाच्या १४ प्रादेशिक विमानतळांमध्ये मुआन विमानतळाने सर्वात जास्त पक्षी मारण्याच्या घटनांची नोंद केली आहे. उड्डाण तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की पक्ष्यांच्या धडकेचे घातक परिणाम होऊ शकतात. विशेषत: मुआनमध्ये शेती आणि किनारी भागांच्या जवळ असल्यामुळे धोका जास्त आहे. दक्षिण कोरियामध्ये पक्ष्यांच्या धडकांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. २०१९ मध्ये १०८ वरून गेल्या वर्षी १५२ पर्यंत वाढ झाली आहे. स्थलांतरित पक्षी कायमचे रहिवासी बनल्यामुळे आणि विमानतळांवर दिसणार्या पक्ष्यांच्या वेळेत आणि प्रजातींमध्ये बदल झाल्यामुळे ही वाढ झालेली असू शकते
२५ डिसेंबर रोजी अझरबैजान एअरलाइन्सचे विमान कझाकस्तानमधील अकताऊ विमानतळाजवळ पडले. त्यात ३८ जण ठार झाले. हे विमान बाकूहून ग्रोझनीला जात होते. तांत्रिक अडचणी आणि खराब हवामानामुळे विमानास तातडीने उतरणे भाग होते. त्या वेळी अपघात झाला.
विमानतळ ध्वनी अडथळे आणि पाळत ठेवण्याच्या यंत्रणेसह अनेक उपायांचा अवलंब करतात. काही विमानतळ आता पक्ष्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ‘एआय’ आणि रडार तंत्रज्ञानाचा शोध घेत आहेत. हवाई प्रवास हा सामान्यतः वाहतुकीचा सर्वात सुरक्षित प्रकार मानला जातो, तरीही त्याच्याशी संबंधित काही धोके आहेत. जेव्हा अपघात होतात तेव्हा त्याचे परिणाम अनेकदा गंभीर होतात. त्यामुळे विमान वाहतूक सुरक्षा सुधारण्यासाठी, विमान अपघातांची प्रमुख कारणे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
या घटनांची पाच मुख्य कारणे आहेत. यामध्ये वैमानिकाची चूक, यंत्रांमध्ये बिघाड, हवामानाची परिस्थिती, हवाई वाहतूक नियंत्रकाच्या चुका आणि दहशतवाद यांचा समावेश आहे. विमान अपघातात पायलटची चूक ही सर्वात मोठी भूमिका असू शकते. उड्डाणाच्या विविध टप्प्यांमध्ये, जसे की टेकऑफ, नेव्हिगेशन आणि लँडिंग दरम्यान वैमानिकांनी केलेल्या विविध चुकांचा यात समावेश आहे. कोलगन एअर फ्लाइट ३४०७ हे १२ फेब्रुवारी २००९ रोजी न्यू यॉर्कमधील एका घरावर कोसळले. पायलटने इशार्यांना योग्य प्रतिसाद न दिल्याने विमानातील सर्व ५० लोकांचा जीव गेला. ही घटना पायलट प्रशिक्षण आणि सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्याचे महत्त्व अधोरेखित करते.
यंत्रातील बिघाडामुळे अंदाजे २२ टक्के विमान अपघात होतात. हे बिघाड डिझाईन, देखभाल आणि उत्पादनातील दोषांमुळे होतात. त्यामुळे विमानाची सुरक्षा धोक्यात येते. एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट १३४४ हे ७ ऑगस्ट २०२० रोजी कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना यांत्रिक बिघाड आणि पायलटच्या चुकांमुळे अपघात झाला. या अपघाताने १८ जणांचा जीव घेतला आणि देखभाल प्रोटोकॉलची गरज किती महत्त्वाची आहे हे दाखवून दिले. हवामानाच्या परिस्थितीमुळे अंदाजे १२ टक्के विमान अपघात होतात. खराब हवामान फ्लाइटवर परिणाम करू शकते. विशेषतः टेकऑफ आणि लँडिंग दरम्यान हा परिणाम जास्त असतो. कमी दृश्यमानता, वादळी वारे, हिमवर्षाव आणि पाऊस यामुळे टेकऑफ आणि लँडिंग कठीण होऊ शकते.
वैमानिकांना हवामानाचे मूल्यांकन आणि नेव्हिगेशन तंत्राचे विस्तृत प्रशिक्षण दिले जाते. तथापि, हवामानातील बदल मोठे धोके निर्माण करू शकतात. प्रगत हवामान रडार प्रणाली वैमानिकांना प्रतिकूल परिस्थितीत उड्डाण मार्ग निवडण्यात मदत करते. हवाई वाहतूक नियंत्रकांच्या चुकींमुळे अंदाजे तीन टक्के विमान अपघात होतात. नियंत्रक अनेक विमानांचे व्यवस्थापन करतात आणि टेकऑफ आणि लँडिंग दरम्यान त्यांच्यामध्ये सुरक्षित अंतर सुनिश्चित करतात; परंतु जास्त वाहतुकीमुळे दोषांचा धोका वाढला आहे.
दहशतवादी हल्ले हा विमान वाहतूक सुरक्षेसाठी एक गंभीर धोका आहे. त्यांच्यामुळे सुमारे सात टक्के प्राणघातक विमान अपघात होतात.विमान कंपन्यांनी या धोक्यांचा सामना करण्यासाठी मजबूत सुरक्षा उपाय लागू केले आहेत, ज्यात कर्मचार्यांची पार्श्वभूमी तपासणी आणि विमानतळावरील स्क्रीनिंग प्रक्रियांचा समावेश आहे. याशिवाय प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. विमान अपघातांची मुख्य कारणे समजून घेणे जागतिक स्तरावर विमान वाहतूक सुरक्षा वाढविण्यासाठी आवश्यक आहे. हवाई वाहतूक उद्योग भूतकाळातील घटनांमधून शिकून आणि नवीन तांत्रिक उपाय आणि धोरणे लागू करून उड्डाण-संबंधित जोखीम कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.
भारतीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने अलीकडेच अनेक नवीन नियम लागू केले आहेत. ते विमानांची सुरक्षा सुनिश्चित करण्यावर लक्ष केंद्रित करतात. नियामक संस्था ‘ब्यूरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सेफ्टी’ (बीसीएएस) ही भारतातील नागरी विमान वाहतूक सुरक्षेसाठी मुख्य नियामक संस्था म्हणून काम करते. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) ’भारतातील आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत हवाई वाहतूक सेवांचे नियमन करते आणि नागरी उड्डाणांशी संबंधित मानके आणि उपाय निश्चित करते.
Related
Articles
चॅम्पियन्स चषकासाठी महमद शमीला मिळणार संधी?
12 Jan 2025
शहरातील तपमानात आजपासून वाढ
10 Jan 2025
शरद पवार यांनी अजित पवार यांचे कौतुक केले असते तर बरे वाटले असते
10 Jan 2025
बालभारतीचे नियंत्रक विवेक गोसावी यांचे निधन
10 Jan 2025
‘पीएम केअर्स’ फंडाकडे लोकांची पाठ
06 Jan 2025
कात्रजमध्ये ४३ लाखांचे अमली पदार्थ जप्त
12 Jan 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
स्वयं अध्ययनातून परिणामकारक शिक्षण
2
डोनाल्ड ट्रम्प यांना दिलासा
3
आरटीई प्रवेशांसाठी पालकांनी दलालांपासून सावध रहावे
4
‘ह्यूमन मेटान्यूमो‘ म्हणजे काय?
5
कुंभमेळा आणि सुरक्षा कवच
6
नवा संघर्ष (अग्रलेख)