श्रीनगर गोठले; पारा उणे एक अंशावर   

श्रीनगर  : केंद्र शासित जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगर गोठली आहे. तपमानाचा पारा उणे एक अंशावर गेला. काश्मीर खोर्‍यात रात्रीचे तपमान किंचित वाढले आहे. येत्या काही दिवसांत पावसासह हलका हिमवर्षावर होईल, असा अंदाज हवामान खात्याने शुक्रवारी दिला. 
 
काश्मीर खोर्‍यात काही ठिकाणी रात्रीच्या किमान तापमानात किंचित वाढ झाली असली तरी बऱ्याच ठिकाणी पारा उणे अंशावर आहे. राजधानी श्रीनगरमध्ये पारा उणे १ अंशावर पोहोचला. गुरुवारी तो उणे २.१ अंश एवढा कमी झाला होता. दक्षिण काश्मीरचे प्रवेशद्वार क्वाझिगुंड येथे पारा उणे १.८ अंशावर होता. पहलगाम पर्यटनस्थळ आहे. तेथील अमरनाथ येथील यात्रास्थळाजवळ सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. तेथे पारा उणे ३.४ अंशावर होता. गुलमर्ग येथे शून्याखाली तर कुपवाडात उणे ०.४ अंशावर पारा होता. दक्षिण काश्मीरमधील कोकेमंग येथे शुन्याच्यावर पारा पोहोचला. पारा ०.६ अंश एवढा होता. वातावरणात फेरबदल होतील. तसेच आज (शनिवारी) पावसाच्या हलक्या सरी पडतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला. 

Related Articles