मलेशियातील अब्जाधीश आनंद कृष्णन यांचे निधन   

क्वालालांपूर : मलेशियातील उद्योगपती आणि अब्जाधीश आनंद कृष्णन यांचे निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि दोन मुली आहेत. कृष्णन यांचे औद्योगिक साम्राज्य मोठे आहे. त्यात दळवळण, माध्यम, पेट्रोलियम आणि बांधकाम व्यवसायाचा समावेश आहे. गुरूवारी त्यांची प्राणज्योत मालवली असल्याची माहिती गुंतवणूक कंपनी उषा तेगस यांच्यावतीने देण्यात आली. ते मलेशियातील सहाव्या क्रमांकांचे श्रीमंत उद्योगपती होते. फोर्ब्सच्या मते त्यांची संपत्ती ५.१ अब्ज डॉलर्स आहे. पण, त्यांनी कधीही संपत्तीचा गववगा केला नाही. तसेच ते कधीही प्रसिद्धीच्या झोतात राहिले नाहीत.  मलेशियाच्या विकासात त्यांचे योगदान मोठे होते. शिक्षण, कला, क्रीडा आणि मानवतेसाठी रक्कमही त्यांनी दान केली. ते पत्नीसमवेत राहात होते. त्यांचा एकमेव मुलगा बौद्ध भिक्षू बनला असून तो थायलंड येथे राहतो. कृष्णन यांच्या दोन मुली त्यांच्या व्यवसायात नाहीत. पंतप्रधान अन्वय इब्राहिम यांनी कृष्णन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

Related Articles