सायप्रस होणार नाटोचा सदस्य   

निकोसिया : सायप्रस देश लवकरच नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन अर्थात नाटोचा सदस्य होणार आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो संघटना कार्यरत असून सदस्य देशांना लष्करी मदत, प्रशिक्षण आणि त्या देशाचे संरक्षणही केले जाते. त्यामुळे बरेच देश संघटनेचे सदस्य होण्यासाठी उत्सुक असतात. 
 
पश्चिम आशियातील भूमध्य सागरात सायप्रस हा बेटांचा देश आहे. त्या देशाचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडॉलाइड्स यांनी देश नाटो संघटनेचा सदस्य होण्यास तयार असल्याचे सांगितले. याबाबत गेल्या महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी चर्चा केली होती. रशिया आणि अमेरिकेतील शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर याबाबतचा निर्णय यापूर्वी सायप्रसने टाळला होता. 

Related Articles