E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
देश
बिरसा मुंडा यांचे पणतू मंगल मुंडा यांचे निधन
Samruddhi Dhayagude
29 Nov 2024
अपघातात डोक्याला गंभीर दुखापत
रांची : झारखंडचे आदिवासी नेते बिरसा मुंडा यांचे पणतू मंगल मुंडा नुकतेच वाहनाच्या टपावरून पडून जखमी झाले होते. उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले, अशी माहिती आरोग्य अधिकार्यांनी शुक्रवारी दिली.
झारखंड येथील कुंती जिल्ह्यात २५ नोव्हेंबर रोजी मंगल मुंडा (वय ४५) वाहनाच्या टपावरून पडले होते. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. गुरूवारी मध्यरात्री साडेबारा वाजता त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जखमांमुळे मेंदूतील दोन्ही भागांत रक्ताच्या दोन गाठी झाल्या होत्या. गंभीर जखमांमुळे त्यांची प्रकृती बिघडत चालली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते. त्यांना वाचविण्याचे प्रयत्न केले; परंतु अपयश आले, अशी माहिती डॉ. हिरेन बिरुआ यांनी दिली.
गुरूवारी त्यांना कुंती येथील सरदार रुग्णालयातून रांची येथील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथे अधिक उपचारासाठी हलविले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगल मुंडा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. मुंडा यांच्या जाण्यामुळे झारखंडमधील आदिवासी समुदायाचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. राज्यपाल संतोष गंगवाल, मुख्यमंत्री हेमंत सोरेन, माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन आणि अन्य नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
Related
Articles
नायलॉन मांजा विक्रेत्यांना गुन्हे शाखेकडून अटक
07 Jan 2025
श्रीलंकेचा विजय; मालिका मात्र न्यूझीलंडच्या खिशात
12 Jan 2025
गँग ऑफ ट्रेकर्सकडून ४ दिवसात ९ गड-किल्ले सर
08 Jan 2025
वरुण चक्रवर्तीची भारतीय संघात निवड होण्याची शक्यता
12 Jan 2025
लाल चेंडूवर खेळायचे तर देशांतर्गत क्रिकेट खेळा : गंभीर
06 Jan 2025
एप्रिलपासून सर्व वाहनांना फास्ट-टॅग बंधनकारक
08 Jan 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
स्वयं अध्ययनातून परिणामकारक शिक्षण
2
डोनाल्ड ट्रम्प यांना दिलासा
3
आरटीई प्रवेशांसाठी पालकांनी दलालांपासून सावध रहावे
4
‘ह्यूमन मेटान्यूमो‘ म्हणजे काय?
5
कुंभमेळा आणि सुरक्षा कवच
6
नवा संघर्ष (अग्रलेख)