तामिळनाडूत एका कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या   

त्रिप्पूर : तामिळनाडून एका कुटुंबातील तिघांची शुक्रवारी अनोळखी व्यक्तींनी  निर्घृण हत्या केली आहे. त्यात पती, पत्नी आणि मुलाचा समावेश आहे.  आरोपींना  विशेष पोलिस पथकाकडून लवकरच पकडले जाइर्ंल, असे सांगण्यात आले. 
 
देवीसिगमन (वय ७८), त्यांची पत्नी अलमेलू (वय ७५) आणि मुलगा संथालिकुमार (वय ४६) यांच्यावर अनोळखी व्यक्तींनी सेवलाई गौडेनपुरदूर गावात हल्ला केला. विवाह सोहळ्यासाठी संथालिकुमार नुकताच  पत्नी, दोन मुलांसह आई वडिलांना भेटण्यासाठी आला होता. तेव्हा घरावर रात्री हल्ला झाला. तिघांवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. त्यानंतर सोन्याचे दागिनेही चोरीला गेले. यानंतर पोलिसांनी परिसर पिंजून काढण्यास सुरूवात केली असून ठिकठिकाणी वाहनांची तपासणी केली जात आहे. हल्लेखोरांना लवकरच अटक केली जाईल, असे ज्येष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले. 

Related Articles