जगात सर्वाधिक नफा कमावणारी कंपनी आहे 'या' देशात   

मिनिटाला करते कोट्यवधींची कमाई

मुंबई : फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, गुगल आणि ॲप्पल या सारख्या बऱ्याच मोठ्या कंपन्या वर्षाला कोट्यवधी रुपये कमावतात पण, जगातील सर्वाधिक नफा कमावणारी कंपनी कोणती आहे? हे तुम्हाला माहीत आहे का? जगात अशा बऱ्याच कंपन्या आहेत ज्यांचे मूल्य इतर देशांच्या GDP एवढे किंवा त्यापेक्षा जास्त आहे. जगात बऱ्याच मोठ्या कंपन्या आहेत, ज्या दर मिनिटाला करोडो रुपये कमावत आहेत. या सर्वाधिक कमाई करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत पहिला नंबर कोणाचा लागतो हे आज जाणून घेऊ. 

जगातील सर्वाधिक नफा कमावणारी कंपनी मुस्लीम देशात 

जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात फायदेशीर कंपन्यांचा विचार केला जातो तेव्हा प्रत्येकाच्या मनात सर्वप्रथम ॲप्पल आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्या येतात. तसेच आपल्याला वाटते की सर्वात मोठी अर्थव्यवस्था किंवा सर्वात शक्तिशाली देशांतील कंपन्या सर्वाधिक नफा कमावत असतील पण, वास्तव त्यापेक्षा कितीतरी पटीने वेगळे नाही. जगातील सर्वाधिक नफा कमावणारी कंपनी अमेरिका किंवा चीन यासारख्या मोठ्या अर्थसत्ता असलेल्या देशात नाही तर मुस्लिम देशात आहे.
 
सौदी अरेबिया येथील धाहरान येथे स्थित 'सौदी अरामको' जगातील सर्वाधिक नफा कमावणारी कंपनी आहे. नफ्याच्या बाबतीत या कंपनीने मेटा, ॲप्पल, मायक्रोसॉफ्ट यासारख्या जगातील मोठ्या कंपन्यांनाही मागे टाकले आहे. एवढेच नाही तर ॲप्पल आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्या त्याच्या नफ्याशी स्पर्धा करू शकत नाहीत.

सौदी अरामकोचा नफा किती

Statistaच्या अहवालानुसार तेल आणि ऊर्जा क्षेत्रात कार्यरत सौदी अरामको या कंपनीने २०२३ मध्ये २४७.४३ अब्ज डॉलर्सचा नफा कमावला तर दुसऱ्या क्रमांकावरील ॲप्पलने ११४.३ अब्ज अमेरिकन डॉलर्सचा नफा कमावला. त्याचवेळी, बर्कशायर हॅथवे तिसऱ्या क्रमांकावर असून कंपनीने गेल्या वर्षी १००.३ अब्ज अमेरिकन डॉलर्सचा नफा कमावला तर, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज मायक्रोसॉफ्टला २०२३ मध्ये ९५.०२ अब्ज डॉलर्सचा नफा झाला. त्यानंतर, अल्फाबेट, गूगलची मूळ कंपनी, ने २०२३ मध्ये ७८.७८ अब्ज डॉलर्सचा नफा कमावला.

सौदी अरामकोचा मालक कोण?

जगातील सर्वाधिक नफा कमावणाऱ्या कंपनीचा मालक कोण ? असा प्रश्न पडला असेल ना... सौदी अरामको पूर्णपणे सौदी अरेबिया सरकारच्या मालकीची असून ही कंपनी सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाते. सौदी अरामको (सौदी अरेबिया ऑइल कंपनी) जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादन आणि ऊर्जा कंपन्यांपैकी एक आहे. अरामको तेल-वायू उत्पादन, शुद्धीकरण आणि वितरणाशी संबंधित असून कंपनी सौदी अरेबियाच्या सरकारद्वारे चालवली आणि व्यवस्थापित केली जाते. मात्र वर्ष २०१९ मध्ये कंपनीचा एक छोटासा भाग सार्वजनिक करण्यात आला आणि रियाध स्टॉक एक्सचेंज (तडावुल) वर सूचीबद्ध झाला. आतापर्यंत रियाध स्टॉक एक्सचेंजमधील कंपनीच्या एका शेअरची किंमत २७.५० सौदी अरब रियाध आहे.

Related Articles