संजीवन समाधी दिन सोहळ्यात लाखो भाविक   

आळंदी, (वार्ताहर) : माऊली-माऊलीच्या जयघोषात कीर्तन सेवा, पुष्पवृष्टी आणि घंटानाद, ‘श्रीं’च्या वैभवी रूपाचे दर्शन, तसेच परंपरेने पहाट पूजा करून माऊलींचा ७२९ वा संजीवन समाधी दिन सोहळा प्रथा परंपरांचे पालन करीत लाखो भाविकांचे उपस्थितीत भक्तीभावात साजरा झाला. यावेळी ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली.   
 
पहाटे विश्वस्त राजेंद्र उमाप यांच्या हस्ते माऊलींच्या संजीवन समाधीवर पवमान अभिषेक पूजा झाली. हैबतबाबा पायरीपुढे हैबतबाबा आरफळकर यांच्या वतीने कीर्तन सेवा झाली. संत नामदेव महाराजांचे १६ वे वंशज माधव महाराज नामदास यांचीदेखील कीर्तन सेवा रुजू झाली. मंदिरात आकर्षक रांगोळी आणि फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. यावेळी मंदिर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त होता.कार्तिकी यात्रा कालावधीत अभिषेक, आरती, महानैवेद्य हा काळ वगळता भाविकांसाठी दर्शन खुले राहिले. कमी वेळेत भाविकांना दर्शन घेता यावे, यासाठी देवस्थानचे व्यवस्थापन आणि कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.   
 
लाखो भाविकांनी ‘श्रीं’चे दर्शन घेतले. काही भाविकांनी मंदिर कलश दर्शन घेत आपली वारी पूर्ण केली.आज (शुक्रवारी) मंदिरात ‘श्रीं’ना पवमान पूजा, महापूजा अभिषेक, महानैवेद्य, कीर्तनसेवा, धुपारती आळंदी देवस्थान यांचे वतीने होईल. सोपानकाका देहूकर यांचे तर्फे कीर्तन सेवा वीणा मंडपात होणार असल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले. त्यानंतर धुपारती होणार आहे.
 
आळंदी मंदिरात संजीवन समाधी दिनी परिमंडळ-३ चे सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, राजेंद्र गौर, वरिष्ठ पोलिस  निरीक्षक भीमा नरके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुतीश नांदुरकर, बापू ढेरे,  पोलिस नाईक मच्छिंद्र शेंडे, दत्त जाधव, राहुल काळे आदींनी बंदोबस्तासाठी मंदिरात नियोजन केले. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीस पिकअप वाहन पुणे जिल्हा वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष विलास बालवडकर यांनी उपलब्ध करून दिले. 
 
या वर्षी सोहळ्यास माजी मंत्री, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार विजय शिवतारे, खासदार संजय जाधव, देवस्थानचे प्रमुख विश्वस्त-विधितज्ज्ञ राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, पंढरपूर देवस्थान विश्वस्त माधवी निगडे, देहू देवस्थान अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे, रवींद्र महाराज हरणे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, उपव्यवस्थापक तुकाराम माने, राजाभाऊ चौधरी, स्वामी सुभाष महाराज, बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार, राजाभाऊ चोपदार, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, चैतन्य महाराज कबीरबुवा, मानकरी साहिल कुर्‍हाडे, माजी नगराध्यक्ष मानकरी राहुल चिताळकर, माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, स्वप्नील कुर्‍हाडे, मंगेश आरु, माजी नगरसेवक डी.डी. भोसले पाटील, राम गावडे, माजी नगराध्यक्ष रोहीदास तापकीर,श्रीधर सरनाईक, संजय घुंडरे, अजित वडगावकर,  राहुल चव्हाण, वैजयंता कांबळे, पुष्पा कुर्‍हाडे, सागर रानवडे, महेश कुर्‍हाडे, अमोल घुंडरे, अमोल वीरकर, ज्ञानेश्वर कुर्‍हाडे, सागर कुर्‍हाडे, संतोष भोसले, विष्णू वाघमारे, विलास तात्या बालवाडकर, वारकरी भाविक व ग्रामस्थ उपस्थित होते.

पहिल्या सार्थ इंग्रजी ज्ञानेश्वरीचे प्रकाशन

श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यानंतर पहिल्या सार्थ इंग्रजी ज्ञानेश्वरीचे प्रकाशन विश्वस्त राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजननाथ साहेब, विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, कबीर मठाचे प्रमुख चैतन्य महाराज लोंढे कबीर बुवा, खासदार संजय जाधव आदींच्या उपस्थितीत झाले. यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक राम गावडे, आध्यात्मिक आघाडीचे संजय घुंडरे पाटील, किरण गवारे आदी उपस्थित होते. डॉ. सुरेंद्र सूर्यवंशी, तुकाराम बुवा गरुड ठाकूर दैठणकर, मीरा तुकाराम गोरडे (सूर्यवंशी) यांनी सार्थ इंग्रजी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी प्रकाशन सोहळ्याचे आयोजन केले.

Related Articles