पीएमआरडीएच्या पथकाकडून अनधिकृत फलकांवर कारवाई   

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) हिंजवडी  येथील अनधिकृत होर्डींगवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. संबंधित होर्डींग काढून टाकत ते पीएमआरडीएच्या पथकाकडून जप्त करण्यात आले आहे.
 
या कारवाईत साधारणपणे  ४० ु २०  चौ. फूट. क्षेत्रावरील अनधिकृत होर्डिंग क्रेन, गॅस कटर  आणि मनुष्यबळाच्या सहाय्याने निष्कासित करण्यात आले. त्यावेळी उपस्थित पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागातील अधिकारी यांचेमार्फत सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम करू नये, असे आवाहन करण्यात आले. 
 
सदरची कारवाई पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पोलिस अधिक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी - पाटील, तहसीलदार सचिन मस्के, तहसीलदार राजेंद्र रांजणे, पोलिस निरीक्षक महेशकुमार सरतापे, कनिष्ठ अभियंता यांनी पार पाडली. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील सर्व अनधिकृत होर्डिंंगसह अनधिकृत बांधकामांचा सर्व्हे सुरु असून अशा अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई चालू राहणार असल्याचे उपजिल्हाधिकरी डॉ. दीप्ती सूर्यवंशी  यांच्याकडून सांगण्यात आले.

Related Articles