नवीन नेतृत्व समोर आले पाहिजे हा पक्षाचा कायम प्रयत्न : चंद्रकांत पाटील   

पुणे : भारतीय जनता पक्ष नेहमीच नवीन नेतृत्व शोधत असते. पक्ष हा प्रयोग त्या-त्या राज्यातील निवडणुकीचे तिकिटे घोषित करत असताना करत असतो. नवीन नेतृत्व समोर आले पाहिजे हा पक्षाचा कायम प्रयत्न असतो. भाजपात आमचे एक संसदीय मंडळ आहे, त्यामध्ये प्रत्येक विषय जातो. महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीतील उमेदवारांची यादी देखील तेथे अंतिम होते. त्यामुळे कोणाला मंत्रिपदे देणार, काय मंत्रिपदे देणार, हे आम्हाला काहीही माहिती नाही, असे मत माजी मंत्री आणि आमदार चंद्रकांत पाटील व्यक्त केले. पुणे पुस्तक महोत्सवाच्या मांडव उभारणीच्या भूमिपूजनप्रसंगी आले असताना पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 
 
नवीन मंत्रिमंडळाच्या रचनेबाबत विचारले असता पाटील म्हणाले, भारतीय जनता पक्षाचे श्रेष्ठी ठरवतील तो निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य असेल. संघटनेचे काम करताना अनेक पक्षश्रेष्ठी आमच्या कामाचे निरीक्षण करत असतात, त्यावरून योग्य तो निर्णय घेण्यात येईल. आम्ही दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली आहे. अलीकडच्या काही वर्षात भाजप नेहमीच नवीन पिढीचा शोध घेत असते. निवडणुकीत उमेदवारी देतानाही एक तृतीयांश जागा या नव्या पिढीला किंवा पहिल्यांदा निवडणूक लढविणार्‍यांना मिळाली पाहिजे, अशी पक्षाची भूमिका आहे. पक्षश्रेष्ठी ठरवतील तेच आम्ही करू. पक्षात आमचे एक संसदीय मंडळ आहे, त्यामध्ये प्रत्येक विषय जातो. महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीतील उमेदवारांची यादी देखील तेथे अंतिम होते. त्यामुळे कोणाला मंत्रिपदे देणार, काय मंत्रिपदे देणार, हे आम्हाला काहीही माहिती नाही.
 
ईव्हीएमबाबत पाटील म्हणाले, ईव्हीएमबाबत सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत स्पष्टपणे सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमविरोधातील याचिका फेटाळून लावताना त्याबाबत टिप्पणी केली आहे. त्यात आमच्या भाषणात जे मुद्दे मांडायला हवेत, तेच न्यायालयाने सांगितले आहे. 

Related Articles