पुणेकरांना मिळणार प्लांट ट्रकची सेवा   

पुणे : बायोफिलिया या संस्थेने होम गार्डन किंवा टेरेस गार्डन यासाठी लागणार्‍या सर्व सेवा घरपोच देण्याच्या दृष्टीने अनोख्या प्लांट ट्रकची निर्मिती केली आहे. अशी माहिती बायोफिलियाच्या सह-संस्थापिका अनुराधा बारपांडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी दुर्गा धर्माधिकारी व अजय बोकील उपस्थित होते.
 
बारपांडे म्हणाल्या, प्लांट ट्रकसारख्या सेवा अमेरिकेत मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्या तरी, भारतात त्या फारशा सुरू झालेल्या दिसत नाहीत. प्लांट ट्रकच्या माध्यमातून होम किंवा टेरेस गार्डनसाठी गरजेच्या सेवा घरपोच देण्याचा आमचा हा प्रयत्न कदाचित भारतातील पहिलाच असावा. प्लांट ट्रकच्या माध्यमातून अनेकविध प्रकारची रोपे, सुंदर डिझाईनच्या कुंड्या, घरातील नैसर्गिक हिरवळीसाठीच्या अ‍ॅक्सेसरिज, आवश्यक खते, इनडोअर व टेरेसवर बागकाम करण्यासाठीच्या आवश्यक सेंद्रिय गोष्टी, इनोव्हेटिव्ह व्हर्टीकल ग्रीनरीचे विविध पर्याय व यासोबतच कुशल मनुष्यबळ तुमचे होम किंवा टेरेस गार्डन नेहमीच फुललेले व हिरवेगार रहावे यासाठी उपलब्ध असेल. घरातील या लहानशा का होईना परंतु शाश्वत हिरवळीशी नागरिकांचे नाते तयार व्हावे, निसर्गाचा सहवास असल्याचा आनंद मिळावा व आजूबाजूचे वातावरण प्रसन्न रहावे यासाठी ‘प्लांट ट्रक’ हे आम्ही टाकलेले एक आश्वासक पाऊल आहे, असे बारपांडे यांनी नमूद केले. दुर्गा धर्माधिकारी बायोफिलिया विषयी माहिती दिली. 
 

Related Articles