E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
पालकमंत्री नात्याने रस्त्याच्या कामाला स्थगितीच दिली : चंद्रकांत पाटील
Samruddhi Dhayagude
11 Nov 2024
एआरएआय टेकडीवर येणार्या नागरिकांशी संवाद
पुणे : पर्यावरण दिनाव्यतिरिक्त ’एक पेड माँ के नाम’ उपक्रमांद्वारे माननीय नरेंद्र मोदीजी यांनी पर्यावरण रक्षणासाठी चळवळ उभारली. त्याशिवाय माझ्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त ६५ हजार वृक्ष लागवड करून ती जगवली देखील. पालकमंत्री नात्याने रस्त्याच्या कामाला स्थगितीच दिली आहे, तरीही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टेकडीचा मुद्दा काढून संभ्रम निर्माण केला जात असल्याची भावना चंद्रकांतदादा पाटील यांनी काल व्यक्त केली.कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज एआरएआय टेकडीवर जाऊन टेकडीवर येणार्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाची भूमिका मांडली.
ते म्हणाले की, पर्यावरण संवर्धनासाठी माननीय नरेंद्र मोदीजी यांनी ’एक पेड माँ के नाम’ उपक्रमांद्वारे लोकचळवळ सुरू केली. त्यामुळे देशभरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झाली. याशिवाय देवेंद्रजींच्या सरकारमध्ये तत्कालीन वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनीही ’हरित महाराष्ट्रा’साठी पाच वर्षे वृक्ष लागवडीचा संकल्प केला. त्यामधूनही मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झाली. मविआ सरकारने याची चौकशी लावली. त्यामधून महाराष्ट्राच्या विविध भागांत वृक्ष लागवड झाल्याचे निष्पन्न झाले.
ते पुढे म्हणाले की, यंदा माझा ६५ वा वाढदिवस संपन्न झाला. त्यामुळे मी कोथरुडसह सर्वत्र ६५ हजार वृक्ष लागवड आणि संवर्धनाचा संकल्प करुन; तो सत्यात उतरवला. कोथरूडमधील म्हातोबा टेकडीवर ६५०० वृक्षांची लागवड करून त्याचे संवर्धन करत आहे. पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात बालभारती पौड रस्त्याच्या कामाला स्थगितीच दिली आहे, अशी भावना व्यक्त केले. यावेळी भाजप कोथरूड दक्षिणचे अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, नगरसेविका छाया मारणे, भाजप नेते बाळासाहेब टेमकर, अमोल डांगे, अनिता तलाठी, आशुतोष वैशंपायन, सुरेखा जगताप, दीपक पवार, अजय मारणे, रणजित हरपुडे, मधुरा वैशंपायन यांच्यासह भाजपचे इतर पदाधिकारी आणि पर्यावरण प्रेमी उपस्थित होते.
Related
Articles
अवधुतांचे परम शिष्य - स्वामी परमानंद
05 Dec 2024
‘माई मसाले’च्या यशात टिमविचे योगदान
06 Dec 2024
अदानी समूहाची श्रेणी घटली
08 Dec 2024
जेजुरीत खंडोबा गडावर चंपाषष्ठी उत्सव सुरू
03 Dec 2024
पुण्यात थंडी ओसरली
03 Dec 2024
पंढरीत १० लाखांच्या बनावट नोटा देऊन शेतकर्याची फसवणूक
08 Dec 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
समाज परिवर्तनाची सकारात्मक चळवळ
2
आणखी दहा दिवस शेवगा खरेदी विसरा!
3
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उद्या पदवी प्रदान सोहळा
4
मसापच्या विभागीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील
5
’संगीत स्वयंवर’नाट्यप्रयोग पुढील आठवड्यात
6
धुक्यातही रेल्वे सुसाट