रिलायन्स इन्फ्रास्ट्रचर संरक्षण सामुग्रीच्या उत्पादनात   

वृत्तवेध

अनिल अंबानींच्या ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रचर’ने आपली ‘रिलायन्स डिफेन्स लिमिटेड’ ही कंपनी स्फोटके, दारुगोळा आणि लहान शस्त्रे तयार करणार असल्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये यासंदर्भात सर्वात मोठा एकात्मिक प्रकल्प उभारला जाईल.स्टॉक एसचेंजमध्ये दाखल केलेल्या नियामक फाइलिंगमध्ये ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रचर’ने म्हटले आहे की कंपनीला धीरूभाई अंबानी डिफेन्स सिटी बांधण्यासाठी रत्नागिरीतील औद्योगिक परिसरात १००० एकर जमीन देण्यात आली आहे. त्याच धीरूभाई अंबानी ‘डिफेन्स सिटी’मध्ये रिलायन्स इन्फ्रास्ट्रचर प्रवर्तित कंपनी रिलायन्स डिफेन्स लिमिटेड स्फोटके, दारूगोळा आणि लहान शस्त्रे तयार करण्यासाठी एक प्रकल्प उभारणार आहे. दारूगोळा श्रेणीमध्ये लहान, मध्यम आणि मोठ्या कॅलिबर आणि टर्मिनली गाइडेड युद्धसामग्रीचा समावेश आहे.‘स्मॉल आर्म्स पोर्टफोलिओ’मध्ये नागरी आणि लष्करी अशा दोन्ही निर्यात बाजारांना लक्ष्य केले जाईल. येत्या दहा वर्षांमध्ये या प्रकल्पात दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रचर’ने सांगितले, की या प्रकल्पासाठी जगातील सहा आघाडीच्या संरक्षण कंपन्यांसह संभाव्य संयुक्त उपक्रम प्रस्तावित आहे. रिलायन्सचा मिहान येथे फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हिएशन आणि थेल्स या दोन आघाडीच्या संरक्षण कंपन्यांसोबत संयुक्त उपक्रम आहे.
 
दसॉल्ट रिलायन्स एअरोस्पेस, थेल्स रिलायन्स सिस्टिम त्यांच्या उत्पादनातील शंभर टक्के उत्पादनांची निर्यात करतात. ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रचर’ने सांगितले, की त्यांच्या उपकंपनीद्वारे कंपनीने एक हजार कोटी रुपयांची संरक्षण उपकरणे निर्यात केली आहेत. ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रचर’च्या उपकंपन्या ‘जय आर्मामेंट्स लिमिटेड’ आणि ‘रिलायन्स डिफेन्स लिमिटेड’ यांना भारत सरकारकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा तयार करण्याचा परवाना आधीच मिळाला आहे.

Related Articles