गाझातील हल्ल्यात ६० पॅलेस्टिनी ठार   

डेअर अल बलाह : इस्रायलने उत्तर गाझावर केलेल्या हल्ल्यात ६० पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला. एका पाच मजली इमारतीवर मंगळवारी सकाळी हवाई हल्ला झाला होता. मृतांमध्ये अर्ध्याहून अधिक महिला आणि मुले आहेत.
 
गाझातील आरोग्य मंत्रालयाशी संलग्न रुग्णालयाचे संचालक डॉ. मारवान अल हमास यांनी सांगितले की, एकूण १७ जण हल्ल्यानंतर बेपत्ता झाले. मंत्रालयाच्या आणीबाणी सेवा विभागाने सांगितले की, १२ महिला आणि २० मुलांचा मृत्यू झाला. त्यामध्ये लहान मुलांचा प्रामुख्याने समावेश होता. 
 
दरम्यान, गाझावरील फास आणखी आवळण्यासाठी इस्रायलच्या संसदेने दोन विधेयके मंजूर केली. त्या अंतर्गत पॅलेस्टिनी निर्वासित नागरिकांना मदत करणार्‍या संयुत राष्ट्राच्या यूएनआरडब्लूए संस्थेला प्रवेश बंदी केली आहे. या संस्थेकडून गाझात पॅलेस्टिनी नागरिकांना भरीव मदत केली जाते. इस्रायलकडून गाझासह लेबाननवर देखील हवाई सुरू आहेत. 

हिजबुल्लाचा म्होरया शेख नईम कासीम

इस्रायलबरोबर सुरू असलेल्या युद्धाच्या धामधुमीत लेबानन येथील हिजबुल्ला दहशतवादी संघटनेने नेतेपदी शेख नईम कासीम यांची नियुती केल्याची घोषणा केली. गेल्या महिन्यात हासन नसरल्लाह ठार झाला होता. त्याच्या जागी कासीम यांची नियुती केली आहे. शुरा परिषदेच्या बैठकीत त्याची एकमताने निवड केल्याचे सांगण्यात आले. तो गेले तीन दशके संघटनेचा उपप्रमुख, सरचिटणीसही होता. कासीम ७१ वर्षांचा आहे. तसेच संघटनेचा संस्थापक सदसय आहे. इस्रायलने १९८१ मध्ये लेबाननवर हल्ला केला होता. त्यानंतर हिजबुल्ला दहशतवादी संघटना उदयास आली होती. 

Related Articles