उत्तर कोरियाची युक्रेन युद्धात उडी   

रशियाच्या मदतीला दहा हजार सैनिक

सेऊल : रशिया आणि युक्रेन युद्धात उत्तर कोरियाने उडी घेतली आहे. त्या अंतर्गत दहा हजार सैनिक रशियाच्या मदतीसाठी पाठविले आहेत. दरम्यान, रशियात उत्तर कोरियाने परराष्ट्र मंत्र्याला पाठविले आहे. रशियाकडून लढणार्‍या सैनिकांना प्रशिक्षणासाठी ते दौर्‍यावर असल्याचे सांगण्यात आले. 
 
उत्तर कोरियाचे दक्षिण कोरियासोबत वैर उघड आहे. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर रशियाच्या मदतीला उत्तर कोरियाकडून सैनिक पाठविले जात असल्याने त्याने चिंता व्यत केली. उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री छोई सॉन हुई यांच्या रशिया दौर्‍यावर गुप्तहेरांची नजर आहे. रशियासाठी अतिरित सैनिक पाठविण्यासाठी ते रशिया दौर्‍यावर गेले असल्याचा अंदाज त्यांनी वर्तविला. 
 
सैनिकांच्या बदल्यात रशियाकडून अधिक मदत प्राप्त करण्याचा उत्तर कोरियाचा डाव असल्याची शंका त्यांनी बोलून दाखविली. लवकरच उत्तर कोरियाचे सैनिक रशियात येतील आणि काही आठवड्यात ते युक्रेनच्या युद्धभूमीवर उतरतील, सैनिकांच्या बदल्यात नवीन तंत्रज्ञान प्राप्त करण्याचा हेतु त्यामागे आहे. त्यामध्ये क्षेपणास्त्रांचे आधुनिकीकरण आणि नवीन शस्त्रांचा सौदा केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Related Articles