शिवसेना उद्धव गट आणि काँग्रेस पक्षाच्या इच्छूकांची वडगावशेरी मतदारसंघातून माघार   

पुणे : महाविकास आघाडी सुस्थितीत आहे. कोणतेही मतभेद न ठेवाता शिवसेना पक्षा  उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षाच्या इच्छूक उमेदवारांनी वडगावशेरी मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांना पाठिबा दर्शविला आहे.वडगावशेरी मतदारसंघात महाविकास आघाडीत इच्छूकांनी मोठी संख्या होती.मात्र सर्व इच्छूकांनी विधानसभा निवडणूकीतून माघार घेतली आहे. बापूसाहेब पठारे हे महाविकास आघाडीतील  इच्छूक उमेदवार आणि  सर्व नेत्यांना समजविण्यास यशस्वी ठरले आहेत. मागील काळात सरकारची  राज्यात आमदारांची आदलाबदली झाल्याने महायुती आणि महाविकास आघाडीत प्रत्येक निवडणुकीत चांगलीच चुरस पाहण्यास  मिळत आहे. विधानसभेच्या निवडणूकीत दोन्ही गटाचे पक्ष उमेदवार निवडून येणार्‍या क्षमता असणार्‍यांना तिकीट मिळत आहे. यासाठी राज्यात महाविकास आघाडीने मोठी ताकद उभा केली आहे. यासाठी कोणत्याच मतदारसंघात विरोध व बंडखोरी होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. कॉग्रेस कडून सुनिल मलके, राहुल शिरसाट, राजू ठोंबरे, सचिन भोसले, शिवसेनेचे नितीन भूजबळ निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली होते. मात्र बापूसाहेब पठारे यांनी सर्वांची समजूत सर्व विकास कामे करण्याची आश्वसने दिली म्हणून सर्वांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची सांगितले. 
 
राज्यात महायुतीची सत्ता असताना वडगावशेरी मतदारसंघात राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटाचे सुनिल टिंगरे आणि भाजपचे जगदीश मुळीक इच्छूक होते. 
यामध्ये महायुतीचे तिकीट सुनिल टिंगरे यांना मिळाले आहे. तर भाजपचे जगदीश मुळीक यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज (मंगळवारी) रोजी अर्ज भरण्याची शेवटीची तारीख आहे. जर मुळीक यांनी अर्ज दखल केला तर चौरंगी निवडणूक होण्याची शक्यता आहे.यासाठी सर्व भाजपचे पदाधिकारी वाट पाहत आहे.महायुतीच्या उमेदवार सुनिल टिंगरे यांना भाजपचे उमेदवार पाठिंबा देणार का ? नाही हे आज मंगळवारी ठरणार आहे. 
 

Related Articles