दाऊद, बिष्णोईचे स्टेटस ठेवल्यामुळे तिघांना अटक   

२३ ऑक्टोबरपर्यंत कोठडी 

पुणे : राष्ष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या केल्यानंतर पुन्हा चर्चेत आलेला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचे फोटो असलेले स्टेटस ठेवणार्‍या तिघांना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली. २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. 
 
याप्रकरणी एका ४० वर्षीय व्यक्तीने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणात तिघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टी. एस. गायगोले यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील भाग्यश्री संचेती (डांगळे) यांनी युक्तीवाद केला की, आरोपींचा दाऊद इब्राहिम टोळीशी काही संबंध आहे का, याचा तपास करायचा आहे. त्यांनी स्टोरीवर ठेवलेले आक्षेपार्ह स्टेटस कोठे बनविले. त्यांना स्टेटस ठेवण्यास कोणी प्रवृत्त केले. त्यासाठी कोणी चिथावणी दिली आहे का, याखेरीज यामध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे, याचा सखोल तपास करायचा आहे. त्यामुळे त्यांना कोठडी देण्याची मागणी संचेती यांनी न्यायालयात केली. न्यायालयाने ती मान्य करत तिघांना २३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

Related Articles