मणिपूरमध्ये सरपंचाची दोन घरे जाळली   

इंफाळ : मणिपूरच्या जिब्राम जिल्ह्यातील एका सरपंचाची दोन घरे जाळण्यात आली आहेत. नुंगखाल परिसरात शनिवारी रात्री जाळपोळीची घटना घडली. हिलघाट ग्रामपंचायतीचे सरपंच एल सोमोरेंद्रो यांच्या मालकीची ही घरे आहेत. यानंतर सुरक्षा पथके परिसरात पोहोचली आणि त्यांनी घटनेचा आढावा घेतला. दहशतवाद्यांच्या गटाने बोरोबेकरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावात बॉम्बफेक केली होती. त्यानंतर दहशतवादी आणि जवान यांच्या चकमक उडाली होती. त्यात कोणीही जखमी झाला नसल्याचे वृत्त आहे.  एकच दिवसांपूर्वी हिंसाचार रोखण्यासाठी मैती आणि कुकी समुदायातील आमदारांनी चर्चा केली होती. त्यासाठी ते दिल्लीत आले होते. कायमस्वरुपी  शांतता निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला होता. दरम्यान, गेल्या वर्षी मे महिन्यापासून इंफाळ खोर्‍यात मैती अणि कुकी समुदायाच्या वांशिक हिंसाचारात आतापर्यंत २०० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. 

Related Articles