E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
क्रीडा
न्यूझीलंडची विजयी आघाडी
Samruddhi Dhayagude
21 Oct 2024
दुबई : भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडने ८ गडी राखून जिंकला आणि १-० अशी आघाडी घेतली. या विजयासह न्यूझीलंडचा ३६ वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आला. न्यूझीलंडने १९८८ नंतर प्रथमच भारतात विजय मिळवला. किवी संघाने तिसर्यांदा भारतात कसोटी सामना जिंकला. टॉम लॅथमची कायमस्वरूपी कसोटी कर्णधार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने आश्चर्यकारक कामगिरी केली.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारताला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. पावसामुळे पहिल्या दिवशी खेळ होऊ शकला नाही. दुसर्या दिवशी नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय संघ फलंदाजीला आला, पण ४६ धावांवर ऑलआऊट झाला.
भारताकडून कोणत्याही खेळाडूला चांगली कामगिरी करता आली नाही. ऋषभ पंतने सर्वाधिक २० धावा केल्या होत्या. एकूण पाच खेळाडूं शून्यावर आऊट झाला. त्याच दिवशी न्यूझीलंडचा संघ फलंदाजीसाठी उतरला तेव्हा त्यांनी दुसर्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत १८० धावा केल्या होत्या. ज्यामध्ये डेव्हन कॉनवेच्या ९१ धावांच्या शानदार खेळीचा समावेश होता.
तिसर्या दिवशी रचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेल न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात करण्यासाठी आले. रवींद्रने १५७ चेंडूत १३४ धावांची खेळी खेळली आणि तो शेवटपर्यंत टिकून राहिला. आपल्या खेळीत त्याने १४ चौकार आणि ४ षटकार मारले. रचिन व्यतिरिक्त टीम साऊदीने आपल्या संघासाठी एकूण ६५ धावांची खेळी खेळली. या शानदार खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या डावात एकूण ४०२ धावा केल्या. भारताकडून कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजाने ३-३ बळी घेतले.
त्यानंतर तिसर्या दिवशी टीम इंडिया फलंदाजीसाठी उतरली. रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी भारताला शानदार सुरुवात करून दिली. रोहित शर्माने शानदार अर्धशतक झळकावले आणि ५२ धावा करून बाद झाला. तर जैस्वालने ३५ धावा केल्या. यानंतर विराट काहलीनेही अर्धशतक झळकावत भारताची धावसंख्या २३१ पर्यंत नेली. चौथ्या दिवशी सरफराज खानने भारतासाठी १५० धावांची शानदार खेळी केली. तर पंत ९९ धावांवर बाद झाला.
Related
Articles
कुंभमेळा आणि सुरक्षा कवच
09 Jan 2025
कामाचे तास आणि ‘माणूस’ (अग्रलेख)
13 Jan 2025
भाचीच्या लग्नसोहळ्यात मामाने कालविले विष
09 Jan 2025
मायक्रोसॉफ्ट भारतात तीन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार
08 Jan 2025
ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभासाठी १७ कोटी डॉलरची देणगी
09 Jan 2025
पुणे-लोणावळा तिसर्या व चौथ्या मार्गाची प्रतिक्षा कायम
09 Jan 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
स्वयं अध्ययनातून परिणामकारक शिक्षण
2
डोनाल्ड ट्रम्प यांना दिलासा
3
आरटीई प्रवेशांसाठी पालकांनी दलालांपासून सावध रहावे
4
‘ह्यूमन मेटान्यूमो‘ म्हणजे काय?
5
कुंभमेळा आणि सुरक्षा कवच
6
नवा संघर्ष (अग्रलेख)