E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
'देवाला राजकारणापासून दूर ठेवा'
Samruddhi Dhayagude
30 Sep 2024
तिरुपतीच्या लाडू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दात फटकारले
नवी दिल्ली : तिरुपती देवस्थानातील वादग्रस्त लाडू प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने आंध्रप्रदेश सरकारी वकीलांना फटकारले. सर्वोच्च न्यायालय म्हणाले की, 'संवैधानिक पदावर असणाऱ्या लोकांनी देवाला राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे.' तिरुपती देवस्थानातील लाडूमधील प्राण्यांच्या चरबीच्या कथित वापरुन दाखल केलेल्या तीन स्वतंत्र अर्जांवर न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी मुकुल रोहतगी यांनी सरकारच्या बाजूने युक्तिवाद केला.
आंध्रप्रदेश सरकारचे वकील मुकुल रहतोगी यांना प्रत्युत्तर देत न्यायमुर्ती बी आर गवई यांनी कडक शब्दांत टिप्पणी केली. ते म्हणाले, जेव्हा तुम्ही घटनात्मक पदावर असता, तेव्हा तुम्ही देवांना राजकारणापासून दूर ठेवावे असे अपेक्षित आहे. तर न्यायालयाने पुढे रोहतगी यांना प्रश्न केला, 'तुम्ही एसआयटी नेमली. मग त्याचे तपशील येईपर्यंत तुम्हाला माध्यमांमध्ये जाण्याची काय गरज आहे? आणि तुम्ही यापूर्वीही माध्यमांमध्ये हजेरी लावली. ही तुमची दुसरी वेळ आहे.'
चंद्राबाडू नायडू सरकारच्या वतीने रोहतगी यांनी असा युक्तिवाद केला की,हे 'बोनफाईड अर्ज नाहीत. मागील सत्ताधाऱ्यांनी सध्याच्या सरकारवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. टीटीडीने त्यांच्या माणसाला कोणत्या प्रकारचा पुरवठा होतोय याच्या स्पष्टीकरणासाठी कारणे दाखवा नोटीस बजावली.'
तर सर्वोच्च न्यायालयाने पुढे सरकारी वकिलांना पुन्हा धारेवर धरले आणि 'लाडू बनवताना दूषित तुपाचा वापर केल्याचा पुरावा काय आहे,' अशी विचारणा केली. त्यावर तिरुपती मंदिरातर्फे वकील सिद्धार्थ लुथरा यांनी आम्ही या प्रकरणी तपास करत असल्याची माहिती खंडपीठाला दिली. यावर न्यायमूर्ती गवई यांनी रोहतगी यांना पुन्हा प्रश्न केला, 'मग लगेच तुम्हाला प्रेसमध्ये जाण्याची काय गरज होती? तुम्ही धार्मिक भावनांचा आदर केला पाहिजे.'
लाडूची चव बरोबर नाही, अशी लोकांनी तक्रार केली असल्याचे लुथरा यांनी सांगितले तेव्हा न्यायालयाने विचारले की, वेगळीच चव असलेला दूषित लाडू तुम्ही तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवला होते का, ज्यावरुन हे समजू शकेल की त्यात दूषित पदार्थांचा वापर केला गेला आहे.'
तर न्यायमुर्ती विश्वनाथन यांनी देखील सरकारी पक्षाला सुनावले आहे. विश्वनाथन यांनी विचारले, 'आपण याप्रकरणी दुसरे एक मत घ्यावे, असे तुमचा विवेक सांगत नाही का? सामान्य परिस्थितीत तर आपण दुसरे मत घेतो, मग या प्रकरणी का नाही. दूषित तूप वापरल्याचा कोणताही पुरावा नाही.'
Related
Articles
सण आणि आर्थिक सुगी
06 Oct 2024
अल्पवयीन आरोपींचे वय १८ वरून १४ करण्याचा सरकारचा विचार
04 Oct 2024
काँग्रेस मुख्यालयातून ढोल न वाजवताच परतले वादक
08 Oct 2024
भोपाळमध्ये अमली पदार्थ निर्मिती कारखान्यावर छापा
07 Oct 2024
रुग्णालयातील सफाई कर्मचारी महिलेवर पर्यवेक्षकाकडून बलात्कार
07 Oct 2024
महाकाय मालवाहू विमान कोलकात्यात प्रथमच उतरले
09 Oct 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
चिकित्सक विचाराला चालना मिळावी
2
‘अभिजात’ मराठी (अग्रलेख)
3
स्कूल व्हॅनचालकाचा मुलींवर अत्याचार
4
विकृतीला चाप
5
कामाचा जीवघेणा ‘ताण’
6
अटीतटीची लढत (अग्रलेख)