हल्ल्यांत बचावलेल्या कर्करोग पीडितासाठी रूग्णालयात आनंद निर्मिती   

युक्रेनमधील अभिनव उपक्रम 

कीव : रशियाकडून युक्रेनवर वारंवार क्षेपणास्त्र हल्ले होत आहेत. अशाच एका हल्ल्यात एक कर्करोगाचा रुग्ण नुकताच बचावला. त्याबद्दल त्याचे रूग्णालयात अनोख्या पद्धतीने स्वागत करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विविध रंगांचा मजेदार पेहराव केलेल्या विनोदवीरांच्या हावभावांमुळे व सुमधूर संगीतामुळे त्या रूग्णाच्या चेहर्‍यावर स्मितहास्य तरळले होते. 
 
युक्रेनमधील आरोग्य व्यवस्थेवर रशिया-युक्रेन युद्धामुळे सध्या प्रचंड ताण आहे. त्यामुळे काही नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने पुढे येत रूग्णालयांत मनोरंजन करणार्‍या कलाकारांचे गट तयार केले आहेत. ओल्हा बल्किना व मरिना बर्डर या तरूणांनी यात पुढाकार घेतला आहे. दोघांनाही रूग्णालयात आनंदोत्सवांचे  आयोजन करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी प्राधान्याने लहान मुलांसाठी हा उपक्रम राबवण्यास सुरूवात केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही परिस्थितीत मुलांच्या चेहर्‍यावरील हसू हरवले नाही पाहिजे.कलाकारांकडून रुग्णालयातील लहान मुलांचे तर मनोरंजन करण्यात येतेच, शिवाय राष्ट्रीय कॅन्सर संस्थेसह इतर बड्या आरोग्यसंस्थांमध्येही जाऊन हास्यतरंग निर्माण केले जात आहेत. याठिकाणी हल्ल्यातून वाचलेल्या हजारो नागरिकांवर उपचार करण्यात येत आहेत. 

Related Articles