युक्रेनचे १२५ ड्रोन पाडले   

कीव्ह : युक्रेनच्या १२५ ड्रोनने रविवारी रशियाच्या हद्दीत घुसखोरी केली. हे ड्रोन नष्ट करताना रशियाच्या हवाई दलाकडून वनक्षेत्र आणि रहिवाशी भागातील इमारतींचे नुकसान झाले. 
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की,  फेब्रुवारी २०२२ मध्ये मॉस्कोने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर पहिल्यांदाच रशियाच्या हद्दीत सर्वाधिक युक्रेनियन ड्रोन दिसले. हवाई दलाला सात भागांमध्ये ड्रोन आढळून आले. व्होरोनेश भागात १७ ड्रोन दिसले. हे ड्रोन नष्ट करताना एका इमारतीच्या काही भागाचे नुकसान झाले. होल्गोग्राड भागात सर्वाधिक ६७ युक्रेनियन ड्रोन नष्ट करण्यात आले. रोस्तोव्हमध्ये १८ ड्रोन दिसले, ते नष्ट करताना तेथील जंगलाला आग लागली. सात भागात घिरट्या घालणारे १२५ ड्रोन हवाई दलाने नष्ट केले. या कारवाईत  कोणतीही जीवितहानी झाली नाही. जंगलातील आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते.

Related Articles