बैरूत : अमेरिकेने सीरियावर दोन हवाई हल्ले केले. यामध्ये अतिरेकी इस्लामिक स्टेट (आयएस) आणि अल कायदाशी संबंधित एका गटाचे ३७ दहशतवादी ठार झाले. मृतांमध्ये दोन प्रमुख दहशतवाद्यांचा समावेश आहे. अमेरिकन लष्कराने रविवारी ही माहिती दिली.अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी मंगळवारी वायव्य सीरियात हल्ला केला. त्यामध्ये अल-कायदाशी संबंधित हुरास अल-दीन गटाचा एक प्रमुख दहशतवादी आणि इतर आठ जणांना लक्ष्य केले गेले.तसेच १६ सप्टेंबरला मध्य सीरियातील दुर्गम ठिकाणी आयएसच्या प्रशिक्षण तळावर मोठा हवाई हल्ला केला. या हल्ल्यात २८ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.
Fans
Followers